Home » Blog » DAMASA Awards: प्रज्ञा पवार, प्राजक्ता हनमघर यांना ‘दमसा’चे पुरस्कार

DAMASA Awards: प्रज्ञा पवार, प्राजक्ता हनमघर यांना ‘दमसा’चे पुरस्कार

सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख यांचाही होणार गौरव

by प्रतिनिधी
0 comments
DAMASA Awards

कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने यंदापासून जनाबाई, सावित्रीमाई आणि कोयनामाई असे तीन पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी अनुक्रमे प्रज्ञा दया पवार, शुभदा देशमुख आणि प्राजक्ता हनमघर यांची निवड करण्यात आली आहे. तिन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्कार प्रदान समारंभ ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते २४ मे रोजी सकाळी दहा वाजता शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. (DAMASA Awards)

सातारा येथील कवयित्री प्रा. रामकली पावसकर यांच्यामार्फत हे पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्यावतीने आई कमल मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ कवयित्रीसाठी जनाबाई पुरस्कार आहे. त्यासाठी प्रज्ञा दया पवार (ठाणे) यांच्या ‘हिल्लोळ हरवून आतबाहेरचा,’ या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली. त्यासाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी काम पाहिले. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यासाठी देण्यात येणाऱ्या सावित्रीमाई पुरस्कारासाठी शुभदा देशमुख (गडचिरोली) यांची निवड करण्यात आली. आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेमार्फत त्या गेली चाळीस वर्षे स्त्रियांच्या सबलीकरणासाठी काम करतात. आदिवासी महिलांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर रचनात्मक कार्य उभारले आहे. (DAMASA Awards)

स्त्री कलावंतासाठी देण्यात येणाऱ्या कोयनामाई पुरस्कारासाठी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांची निवड करण्यात आली. कॉमेडीची बुलेटट्रेन या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या प्राजक्ता यांनी धिंगाणा, धुरळा, गोष्ट एका पैठणीची, बस्ता, पाणीपुरी, आता थांबायचं नाय अशा विविध चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. मराठी साहित्य तसेच विविध चळवळींशी जोडून घेणाऱ्या प्राजक्ता हनमघर यांना आजच्या काळात ठाम भूमिका घेणाऱ्या कलावंत म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा :
‘ईडी सर्व मर्यादा ओलांडत आहे’
महिना उलटला तरी दहशतवादी सापडेनात

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00