कोल्हापूर : प्रतिनिधी : डिबेंचरपोटी जी रक्कम कापून घेतली आहे ती रक्कम दूध उत्पादक आणि संस्थांना परत मिळावी या मागणीसाठी गोकुळ दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाई म्हशीसह गोकुळच्या कार्यालयावर ‘जवाब दो’ मोर्चा काढला. गाई म्हशीसह गोकुळच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिस आणि आंदोलकामध्ये झटापट झाल्याने दूध उत्पादक संताप व्यक्त केला आहे. या मोर्चाचे नेतृत्व विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केले. (Milk Producers and Police clash)
दूध उत्पादकांचा जवाब दो मोर्चा
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळला यंदा फायदा झाल्याने दूध उत्पादकांना १३५ कोटी अधिक रक्कमेचा फरक दिला आहे. राज्यात सर्वात जास्त फरक दिला आहे असा दावा गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी केला आहे. पण प्रत्यक्षात गोकुळ दूध संघांने डिबेंचरमध्ये मोठी कपात केल्याने दूध उत्पादक आणि दूध संस्थामध्ये संतापाची लाट उसळली आहे. गोकुळ दूध संघाला जाब विचारण्यासाठी आज गुरुवारी ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. (Milk Producers and Police clash)
दूध उत्पादक आणि पोलिसांत झटापट
ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयावर गाई म्हशीसह दूध उत्पादकांनी मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व गोकुळच्या संचालक शौमिक महाडिक यांनी केले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. गोकुळच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी गाई म्हशीसह कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी अटकाव केला. पोलिसांनी गाई म्हशीसह आंदोलकाना पोलिसी बळाचा वापर करुन मागे हटवले. यावेळी मोठा गोंधळ झाला. शेतकऱ्यांनी गोकुळ प्रशासनाच्याविरोधात घोषणा दिल्या. (Milk Producers and Police clash)
कपात केलेली रक्कम परत देण्यासाठी महाडिकांची मागणी
गोकुळच्या फरक बिलातून ४० टक्के रक्कम डिबेंचर म्हणून कपात केली आहे. ही रक्कम परत द्यावी अशी मागणी शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली. यावेळी बोलताना शौमिका महाडिक म्हणाल्या. गोकुळ दूध संघाला मोठा फायदा झाला आहे. ठेवी वाढल्या आहेत. पण गोकुळ फरक बिलातून ४० टक्के रक्कम डिबेंचर म्हणून कपात करण्याचा निर्णय चुकीचा आहे. शेतकऱ्यांची भावना समजून त्यांना कपात केलेली रक्कम परत द्यावी अशी मागणी शौमिका महाडिक यांनी केली.
गोकुळ अध्यक्षांनी सुवर्णमध्ये काढावा
आपण गोकुळच्या विरोधात नसून गोकुळचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने याबाबत सुवर्णमध्य काढावा, असे शौमिका महाडिक म्हणाल्या. हा दूध उत्पादकांचा मोर्चा असून त्यांच्या जीवावर आपण निवडून आलो असल्याने मोर्चात सहभागी झालो आहे असे त्यांनी सांगितले. आंदोलनात गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव, धैर्यशील देसाई यांच्यासह दूध उत्पादक सहभागी झाली होते. (Milk Producers and Police clash)