Home » Blog » गोगावलेच्या पुत्रावरील गुन्ह्यांचा तपास  अधिकाऱ्याची सहकुटुंब आत्महत्या करण्याची धमकी 

गोगावलेच्या पुत्रावरील गुन्ह्यांचा तपास  अधिकाऱ्याची सहकुटुंब आत्महत्या करण्याची धमकी 

by प्रतिनिधी
0 comments
Minister Gogavale's son threatens officer investigating crime

जमीर काझी : मुंबई : उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढल्याने चर्चेत आलेल्या महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या महाडमधील राडा प्रकरणात आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी सहकुटुंब आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. विकास गोगावले यांना वाचवण्यासाठी रायगडचे जिल्हा पोलीस प्रमुख अंजीत दलाल, अप्पर अधीक्षक शिवतरे माझ्यावर प्रचंड दबाव टाकत आहेत त्यामुळे आपल्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे पत्र त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना लिहिले आहे. या पत्रामुळे राजकीय व पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Minister Gogavale’s son threatens officer investigating crime)

 देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांच्या मुलाला वाचवण्यासाठी पोलीस दलावर राजकीय दबाव टाकण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलं आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या पत्रामुळे महाराष्ट्राच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, गोगावले पिता-पुत्राभोवती वादाचे जाळे निर्माण झाले आहे.  

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मोठा राडा झाला होता. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल केले होते. एका गुन्ह्यात मंत्री गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हा मुख्य आरोपी आहे. घटनेनंतर तो जवळपास दीड महिना फरारी होता आणि अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्यावरून उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवद्र फडणवीस याच्यासह राज्य सरकारला फटकारले होते. त्यानंतर विकास पोलिसांना शरण आला होता. त्यामुळे सरकारसह पोलिसांची मोठी बेइज्जत्ती झाली होती. आता या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती तपास अधिकारी तडवी यांच्या पत्रामुळे समोर आली आहे. निरीक्षक रमेश तडवी यांनी आपल्या पत्रात स्पष्ट आरोप केला आहे की, विकास गोगावले याला या प्रकरणातून वाचवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला होता. बेकायदेशीरपणे इतर तीन व्यक्तींना या गुन्ह्यात अटक करण्यासाठी तडवी यांना भाग पाडले जात होते, मात्र त्यांनी त्याला नकार दिला.

 गोगावले याला सहकार्य करण्यास नकार दिल्याने रमेश तडवी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तडवी यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, ते आदिवासी भिल्ल समाजाचे असल्याने त्यांना वारंवार जातीवाचक हीन वागणूक देण्यात आली. (Minister Gogavale’s son threatens officer investigating crime)

उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि इतर वरिष्ठ अधिकारी त्यांना “तू खालच्या जातीचा आहेस, तू इथे कसा राहतोस तेच बघतो” अशा धमक्या देत असत. राजकीय दबावाला बळी न पडल्यामुळे तडवी यांची दोन वर्षांत दोन वेळा विनाकारण बदली करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या मानसिक त्रासात भर पडली.

 आपल्या आत्महत्येच्या पत्रात रायगडच्या पोलीस अधिक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवधरे आणि इतर सात अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. तडवी यांच्या दाव्यानुसार, या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून त्यांचा छळ केला आणि विकास गोगावले याला वाचवण्यासाठी रचलेल्या कटामध्ये ते सहभागी होते. 

वरिष्ठाकडून वारंवार अपमान 

वरिष्ठाकडून विनाकारण वारंवार होणाऱ्या अपमानजक बदल्यांच्या धमकीमुळे तडवी आणि त्यांचे कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे. “आता हा अन्याय सहन होत नाही, त्यामुळे मी आणि माझे कुटुंब आत्महत्या करीत आहोत,” असे टोकाचे पाऊल उचलण्याची भाषा तडवी यांनी डीजी दाते यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

मंत्री गोगावलेनी आरोप फेटाळले

दरम्यान, मंत्री गोगावले यांनी तडवी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाचा आमचा काहीही संबंध नाही. तडवींची नार्को टेस्ट करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Minister Gogavale’s son threatens officer investigating crime)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00