इतिहासकार सांगतात की कार्ल मार्क्स यांचा जन्म १८१८ मध्ये ट्रियर, जर्मनी येथे झाला होता. चुकीचे आहेत ते. त्यांचा जन्म खूप आधी झाला होता — सरस्वती नदीच्या काठावर — आणि त्यांचे नाव होते मनू. पुरावा पहा. मार्क्स यांनी मानवतेला वर्गांमध्ये (Classes) विभागले. मनू यांनी वर्णांमध्ये. मार्क्स म्हणाले की भांडवलदार अतिरिक्त मूल्य (Surplus value) दाबून बसला आहे. मनू म्हणाले की वृत्रासुर पाण्याला दाबून बसला आहे. खलनायक एकच आहे — फक्त उच्चार वेगळा आहे.
देवदत्त पटनायक
मार्क्स यांचा भांडवलदार आपल्या चार भिंतींच्या फॅक्टरीत बसून कामगारांचे श्रम पिळून घेतो. मनू यांचा शम्बर आपल्या किल्ल्यात बसून विश्वातून सोम पिळून घेतो. इंद्र किल्ला तोडतात. कम्युनिस्ट जाहीरनामा (Communist Manifesto) किल्ला तोडतो. योगायोग म्हणता? असेल, असेल ! तुमचा योगायोगावर विश्वास असेल तर — पण योगायोगावर मनूचा विश्वास होता, ना मार्क्सचा. (Marx was Manuch)
मार्क्स म्हणाला, धर्म ही जनतेची अफू आहे. मनूने इंद्राला सोम दिला. सोम, लॅाजिकली पाहत, एक अंमली पदार्थ आहे. मार्क्सने फक्त युरोपीय जनतेसाठी रूपक बदलले—
माशाची गोष्ट तर सर्व काही फिट करून टाकते. मनू लहान माशाचे मोठ्या माशापासून रक्षण करतो. मार्क्स याला “दास कॅपिटल, खंड एक” म्हणते. लहान मासा मोठा होऊन मनूंचे रक्षण करतो. मार्क्स याला सर्वहारा वर्गाची हुकूमशाही म्हणतो. जेव्हा कर्ज फिटते, तेव्हा इतिहास संपतो. मार्क्स याला साम्यवाद म्हणतात. मनू याला म्हणतो— धर्मो रक्षति रक्षितः. वाक्य एकच आहे. फक्त एका वाक्यात छंद (लय) आहे! (Marx was Manuch)
यज्ञाचा सिद्धांत…. — देहि मा ददामि ते, जे मला द्याल, तेच मी तुम्हाला देईन — ही परस्पर जबाबदारीची एक बलिदानात्मक अर्थव्यवस्था आहे.
हाच मार्क्सवादी राजकीय अर्थशास्त्राचा ‘ग्रुंड्रिस’ (Grundrisse) देखील आहे — जर मार्क्सला संस्कृत येत नव्हती. आली असती तर बरे झाले असते.
हे साम्य कुणाच्या का लक्षात आले नाही?… कारण १९ व्या शतकातील ब्राह्मण विद्वान ऋग्वेदाला त्याच्या उच्चारणासाठी) पाठ करत होते, अर्थासाठी नाही.
आणि १९ व्या शतकातील जर्मन विद्वान हेगेल वाचत होते — तेही उच्चार म्हणून, अर्थासाठी नाही. दोन्ही परंपरांनी असेच लोक निर्माण केले जे मजबूत पाठांतर करू शकत होते, पण त्यांना त्याचे आकलन अजिबात होत नव्हते!
खरी शोकांतिका ही आहे की डाव्या विचारवंतांनी मनूंना उजव्या विचारसरणीचे प्रतीक बनवले आणि उजव्या विचारवंतांनी मार्क्स यांना डाव्या विचारसरणीचे — दोघेही एकच गोष्ट सांगत होते: मोठ्या माशाने लहान माशाला खाता कामा नये, आणि सोमरस कोंडून बसला आहे, त्याला इंद्र तोडेल — किंवा इतिहास. दोन्ही एकच आहे.
दोन्हीत फरक फक्त एकच आहे. मनूला ठाऊक आहे की कर्ज दोन्ही बाजूंनी फेडायचे असते. मार्क्स हा भाग विसरतो. म्हणूनच मनूंची व्यवस्था तीन हजार वर्षांपासून चालत आली आहे, आणि प्रत्येक मार्क्सवादी राज्य आतापर्यंत केवळ सत्तर वर्षे टिकले आहे. धर्मो रक्षति रक्षितः।धर्माचे रक्षण करा, धर्म तुमचे रक्षण करेल.मार्क्सने यांनी याचे भाषांतर असे केले — कामगारांना उत्पादनाच्या साधनांवर ताबा मिळवावा लागेल.
जवळपास पोहोचला होतास, कार्ल. अगदी जवळ. (Marx was Manuch)
अनुवाद: शरद नावरे