Home » Blog » मेस्सीची हॅटट्रीक, एम्बापे, हालांडही  चमकला

मेस्सीची हॅटट्रीक, एम्बापे, हालांडही  चमकला

by प्रतिनिधी
0 comments
Messi's hat-trick

नवी दिल्ली : फिफा वर्ल्डकपमध्ये जगभरातील फुटबॉल शौकनांच्या गळ्यातील ताईत असलेल्या लिओनेल मेस्सीने अल्जेरिया विरुद्ध शानदार हॅटट्रीक साजरी केली. सेनेगल संघाविरुद्ध फ्रान्सने ३-१ असा  विजय मिळवताना स्टार खेळाडू किलियान एम्बापेंने दोन गोल केले. नार्वेने ४-१ अशी मोठ्या विजयाची नोंद करताना एरलिंग हालांडने दोन गोल केले. ऑस्टियाने जॉर्डनचा ३-१ असा पराभव केला. (Messi’s hat-trick)

मेस्सीने ३६ वर्षाचा विक्रम मोडला

आजच्या सामन्यात अल्जेरिया विरुद्ध १७ व्या मिनिटाला एका वेगवान फटक्याने मेस्सीने या वर्ल्डकपमधील पहिल्या गोलची नोंद केली. त्यानंतर अर्जेटिनाच्या अलेक्सिस मॅक अलिस्टरचा वेगवान फटका तटवताना चेंडू परत रिबाँड झाला. ती संधी साधत मेस्सीने दुसऱ्या गोलची नोंद केली. ७६ व्या मिनिटाला वेगवान फटक्यावर मेस्सीने तिसरा गोल करत हॅटट्रिक साजरी केली. मेस्सी हा ३९ वर्षाच्या आसपास असून त्याच्या वयातील बहुतेक खेळाडू निवृत्त झाला असताना आज त्याने हॅट्ट्रिक साजरी करत सर्वांना चकित केले. त्याने रॉजर मिल्लाचा विक्रम मोडला. सर्वात जास्त वयोगटाचा हॅटट्रिक करणारा अशी नोंद मिलाच्या नावावर होती. ३६ वर्षांनी हा विक्रम मोडला.

फ्रान्सची सेनेगलवर मात

फ्रान्सने सेनेगलवर ३-१ अशी मात केली. पूर्वार्धात सामना कंटाळवाणा झाला. उत्तरार्धात फ्रान्सचा धडाकेबाज खेळ सुरू झाला. कर्णधार एम्बापेने दोन गोल केले. दुसरा गोल त्याने स्टापेज टायमिंगमध्ये वेगवान फटक्यावर केला. (Messi’s hat-trick)

नार्वेच्या हालांडची जादू

नार्वेने सलामीच्या सामन्यात इराकचा ४-१ असा पराभव केला. १९९८ नंतर प्रथम नार्वे विश्वचषक स्पर्धेत खेळत होता. अर्लिंग हालांडने दोन गोल केले. दोन्ही गोल मध्यंत्तरापूर्वी केले. तीन गुणासंह नार्वे आय गटामध्ये तीन गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे.

ऑस्ट्रियाचा जॉर्डनवर विजय

.ऑस्ट्रियाने जॉर्डनवर ३-१ असा विजय मिळवला. ऑस्ट्रियाकडून पहिला गोल २० व्या मिनिटाला झेव्हर श्लागरच्या पासवर रोमानो श्मिडने केला. पुढच्या मिनिटाला जॉडनने गोल करत बरोबरी साधली. ओलवानने गोल केला. जॉर्डनचा दुसऱ्या स्वयंगोल झाला. त्यानंतर अर्नाउटोविचने तिसरा गोल केला. (Messi’s hat-trick)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00