Home » Blog » के.पी.पाटील यांच्या हाती शिवबंधन!

के.पी.पाटील यांच्या हाती शिवबंधन!

उद्धव ठाकरेंनी केले पक्षात स्वागत

by प्रतिनिधी
0 comments
KP Patil

मुंबई; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी आज (दि.२३) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला. ते गेले काही मुंबईत तळ ठोकून होते. राधानगरी भुदरगड मतदारसंघाची जागा ठाकरे शिवसेने गटाकडे गेल्याने माजी आमदार के.पी.पाटील व त्यांचे मेहुणे ए.वाय.पाटील यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.

आज (दि.२३) मातोश्री येथे माजी आमदार के.पी.पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत, संजय राऊत आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00