मुंबई : मला मराठी बोलता येत नाही, मी मराठी बोलणार नाही, अशी मुजोरीची भाषा करणारे मुंबईतील उद्योजक सुशील केडिया यांनी शनिवारी () ट्विट करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. (Kedia apologizes)
मला मराठी बोलता येत नाही, रोजच्या वापरात जी भाषा असते त्यामध्ये जो अस्खलितपणा असतो तो येत नाही. त्यामुळे मला मराठी बोलता येत नाही. मी तसा प्रयत्न करेन. सध्या मराठीच्या प्रश्नावरून तणावाचे जे वातावरण निर्माण झाले आहे, ते निवळावे आणि शहरातील वातावरण बिघडू नये, राज ठाकरे यांना माझी तशी विनंती आहे, माझी त्यांना मनापासून नम्र विनंती आहे, असे केडिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Kedia apologizes)
‘मी ३० वर्षे मुंबईत राहतो पण मला मराठी येत नाही. मी मराठी नाही. राज ठाकरे काय करायचे बोला?,’ असे ट्विट केडिया यांनी शुक्रवारी (४ जुलै) केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात मनसे सैनिक आक्रमक झाले होते.
केडिया यांच्या कार्यालयाची मोडतोड
दरम्यान, शुक्रवारच्या ट्विटनंतर मनसैनिक आक्रमक झाले. त्यांनी केडिया यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. कार्यालयाची मोडतोड केली. त्यामुळे वातावरण तणावूपर्ण झाले.
हेही वाचा :
एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे
शिंदे गुजरात आणि शाहांचे गुलाम : सपकाळ