पाटणा : येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि मगध रुग्णालयाचे संस्थापक गोपाळ खेमका यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी (४ जुलै) रात्री उशिरा पाटण्याच्या गांधी मैदान परिसरातील त्यांच्या निवासस्थानाजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांचा मुलगा गुंजन खेमका यांची वैशाली जिल्ह्यात अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे सहा वर्षांनी गोपाळ खेमका यांची हत्या करण्यात आली आहे. (Businessman Shot Dead)
खेमका हे पाटण्याच्या व्यापारी समुदायातील एक प्रमुख व्यक्ती होते. ते भारतीय जनता पक्षाशी (भाजपा) संबंधित असल्याचे वृत्त आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री ११:४० वाजता राम गुलाम चौकाजवळ हॉटेल पनाशेला लागून असलेल्या ट्विन टॉवर निवासी संकुलाजवळ खेमका त्यांच्या कारमधून बाहेर पडत होते. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळ्या घातल्या. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. (Businessman Shot Dead)
शहर पोलीस अधीक्षक (मध्य) दीक्षा म्हणाल्या की, घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पाठविण्यात आली. त्यांना घटनास्थ्ळाही एक गोळी आणि एक पुंगळी सापडली. खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी रुग्णालयात आणि नंतर गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचून कारवाई केली, असे त्या म्हणाल्या. (Businessman Shot Dead)
‘‘आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. हल्लेखोर दुचाकीवरून आले असल्याचा संशय आहे. अधिक तपशील आणि या कृत्यामागाचे कारण शोधण्यासाठी आम्ही सर्व बाजूंनी प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत,’’ असे दीक्षा म्हणाल्या. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील भाजप-जेडी(यू) सरकारवर राज्यात अराजक सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. अशा वेळी ही घटना घडली आहे. या घटनेच्या काही तासांपूर्वी, दुसऱ्या एका घटनेत सिवानमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले.
हेही वाचा :
एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे
नीरव मोदीच्या भावाला अटक