Home » Blog » मुश्रीफांची भाषा कागलकर सहन करणार नाहीत : संजय पवार

मुश्रीफांची भाषा कागलकर सहन करणार नाहीत : संजय पवार

समरजितराजेंना निवडून देण्याचे केले आवाहन

by प्रतिनिधी
0 comments
Sanjay Pawar file photo

कागल : प्रतिनिधी : छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज व सीएसारखे उच्चशिक्षित असलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत, यापुढे जाऊन राजघराण्यातील महिलांवरही ते अपशब्द वापरत आहेत. त्यांची अशी मस्तीची भाषा कागलकर कदापिही सहन करणार नाहीत, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार यांनी दिला.

बामणी (ता. कागल) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या  प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), लाल बावटा बांधकाम कामगार संघटना, सिटु सलग सर्व संघटना, किसान सभा या राज्यस्तरीय संघटनांचा घाटगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला.

पवार पुढे म्हणाले, कोल्हापूरकरांवर अनंत उपकार असलेले शाहू महाराज जर कागलच्या घाटगे घराण्यात जन्मले नसते. तर ही देणगी कोल्हापूर संस्थानला मिळाली नसती. त्यांचे नातू स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या बोटाला धरून मुश्रीफ राजकारणात आले. समरजितराजे यांच्यावर पातळी सोडून टीका करताना हसन मुश्रीफांनी याची तरी जाणीव ठेवावी. शाहू महाराजांच्या वंशजास निवडून देऊन त्यांच्या रुणातून उतराई होऊया.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00