Home » Blog » Jarange allegations against Munde : मुंडेनी हत्येची सुपारी दिली ; मनोज जरांगेचा आरोप

Jarange allegations against Munde : मुंडेनी हत्येची सुपारी दिली ; मनोज जरांगेचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Jarange allegations against Munde

जालना : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली हत्या करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या आरोपाने राज्यात खळबळ उडाली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची तक्रार काल जालना पोलिसांकडे आली होती. हत्येचा कट कुणी रचला याबाबत तर्क वितर्क सुरूअसतानाच जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मुंडे यांचे नाव घेऊन बॉम्ब टाकला. (Jarange allegations against Munde)

जरांगे यांच्या हत्या करण्याचा कट रचणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही संशयितांसोबत  धनंजय मुंडे यांच्या भेटी झाल्या आहेत, असा आरोप केला आहे. बीडमध्ये संशयित आणि मुंडे यांच्यात बैठक झाली आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. धनंजय मुंडे यांची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असेही जरांगेनी सांगितले. (Jarange allegations against Munde)

छत्रपती संभाजीनगरजवळ एका ठिकाणी मुंडे आणि संशयिताची भेट झाली. आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देण्याची योजना असल्याचा दावा जरांगेनी केला. मुंडे यांनी थेट आपल्याचा भिडायला हवे होते असे आव्हानही त्यांनी दिले.

राज्यातील अनेक नेत्यांना धनंजय मंडे आणि त्यांच्या टोळीचा धोका आहे असा आरोपही जरांगे यांनी केला. सध्या हे प्रकरण पोलिसांकडे असल्याने त्याविषयी जास्त खुलासा करु शकत नाही असा दावा जरांगे यांनी केला. मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, बीड जिल्ह्यातील नेते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा भाचा यांच्याविषयीचे कॉल रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. वंजारी समाजातील काही अधिकारी, ओएसडी यांना हाताशी धरुन धनंजय मंडे कट रचत असल्याचा आरोपी त्यांनी केला. (Jarange allegations against Munde)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00