नवी दिल्ली : मतचोरीतून स्थापन झालेल्या सरकारमधील एक माजी मंत्र्याच्या मुलाने जमिन चोरी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल राहूल गांधी यांनी उपस्थित केला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मोक्याची ४० एकर जमीन अवघ्या ३०० कोटींमध्ये खरेदी केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता खुद्द लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी उडी घेत थेट पंतप्रधानांना सवाल केला आहे. (Modi silent on land theft)
राहुल गांधी यांनी एक्स वर पोस्ट करताना म्हटले की, महाराष्ट्रात दलितांसाठी राखीव असलेली १८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन एका मंत्र्यांच्या मुलाच्या कंपनीला फक्त ३०० कोटी रुपयांना विकण्यात आली. त्यासोबतच, स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्यात आले. याचा अर्थ या प्रकरणात लूट आणि कायदेशीर मंजुरीचा शिक्का मिळाला. खरं तर मतांच्या चोरीतून स्थापन झालेल्या सरकारची ही ‘जमीन चोरी’ आहे. त्यांना माहित आहे की, त्यांनी कितीही लुटले तरी ते मते चोरून पुन्हा सत्तेत येतील. त्यांना लोकशाहीची, जनतेची किंवा दलितांच्या हक्कांची पर्वा नाही. तसेच पंतप्रधान मोदी यांचे मौन बरेच काही सांगते. मोदी गप्प आहेत, कारण त्यांचे सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या लुटारूंवर अवलंबून आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. (Modi silent on land theft)