बीड : प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक मनोज जरांगेची उपोषणामुळे खालावली असून त्यांच्यावर बीड जिल्ह्यात पाटोदा येथे उपचार सुरू आहेत. प्रकृती खालावली असताना त्यांनी उद्या गुरुवारी दुपारी एक वाजता मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. दरम्यान पोलिसांनी ५० प्रमुख आंदोलकांची यादी मागितली आहे. १९ सप्टेंबर रोजी जरांगे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण कायम सुरू ठेवणार आहेत. (Jarange Patil’s health has deteriorated)
जरांगे यांच्यावर उपचार सुरु असून बुधवारी सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सलाईनुमळे माला आज उठता आले नाही. उद्या गुरुवारी दुपारी एक वाजता मुंबईकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठ्यांनी मुंबईला कधी यायचं हे लवकरच सांगणार आहे असेही ते म्हणाले.
जरांगेचा बीपी, शुगर डाऊन
काल मंगळवारी मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा देत अंतरवाली सराटी सोडले. काल बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे पहिला मुक्काम होता. पण उपोषणाचा १९ दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांची शुगर आणि बीपी कमी झाल्याने जरांगे यांच्यावर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. आज दुपारी एक वाजता डॉक्टरांनी जरांगेची तपासणी केली असता त्यांची शुगर आणि बीपी अत्यंत कमी झाल्याचे समोर आले. त्यांनी उपचार न घेतल्यास त्यांची प्रकृती चिंताजनक होऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले. पण उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला. त्यानंतर डॉक्टरांच्या आग्रहानंतर त्यांना सलाईन लावण्यात आले. उपोषणामुळे पोटात आणि पायात तीव्र वेदना होत आहेत. प्रचंड अशक्तपणामुळे त्यांना जागेवरुन उठता येणे कठीण झाले आहे. त्यामुळे मुंबईकडे जाण्याचा प्रवास थांबला आहे. त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्तेही मोठ्या संख्येने पाटोदा येथे आले आहेत. (Jarange Patil’s health has deteriorated)
विखे पाटलांचे जरांगेना आवाहन
दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंना आंदोलन थांबवण्याचे आवाहन करुन तोडगा काढण्याची विनंती केली आहे. गणेशोत्सवात भाविकांचा त्रास होऊ असे मतही त्यांनी व्यक्त केले. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आशिष शेलार यांच्यावर केलेल्या टीकेवर मंत्री अशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जरांगे राजकारण करत असून आता त्यांची ही भाषा चालणार नाही, असा इशारा दिला आहे.
पोलिसांनी मागितली आंदोलकांची माहिती
मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पण मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केले. मुंबई पोलिसांकडे आंदोलन करण्यासाठी परवानगी तिसरा अर्ज दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनाची सविस्तर माहिती मागितली आहे. जरांगेसोबत असलेला वाहनांचा तपशील, स्वयंसेवकांची यादी मागितली आहे. (Jarange Patil’s health has deteriorated)