कोल्हापूर : प्रतिनिधी : पत्नीवर हल्ला करुन दरोडखोरांनी दागिने लुटले. दरोडखोऱ्याच्या हल्ल्यात पत्नी जागीच ठार झाली. पतीने दरोडखोरांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण दरोडखोर पळून गेले. पोलिसांनी पतीची फिर्याद लिहून घेतली आणि तपास सुरू केला. पण कर्जबाजारी असलेल्या पतीनेच पत्नीने दागिन्यास नकार दिल्याने तिचा खून केला आणि दरोड्याचा बनाव रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. पोलिसांनी सुशांत सुरेश गुरव (वय ३५ वर्षे रा. मडिलगे, ता. आजरा, जि. कोल्हापूर) याला अटक केली. अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी तपास करत गुन्ह्यातील फिर्यादी असलेल्या पतीलाच आरोपी म्हणून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या.
फिर्यादीने दिली दरोड्याची तक्रार
मडिलगे येथील सुरेश गुरव हे कॅटरिंगचा व्यवसाय करतात. पत्नी पूजा गुरव (वय ३२) आणि सोपान आणि मुक्ता हे जुळी मुलासह ते मडिलगेत रहात होते. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता सुरेश गुरव घराच्या मागील बाथरुममध्ये गेले. त्यानंतर पाच मिनिटात त्यांची पत्नी पूजा गुरव हिचा ओरडण्याचा आवाज आला. त्या धावत बाथरुममध्ये घरात आला असता एक व्यक्तीन पत्नीला मारत होता. तर दोघांनी पत्नीला धरले होते. तिसरा व्यक्ती तिच्या हातातून पैशांची शबनम बॅग ओढत होता. एका व्यक्तीने पूजा गुरव यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर ते पैसे असलेले बॅग घेऊन चौघे दरोडखोर घराच्या मागील दरवाजातून पळून गेले. त्यानंतर सुशांत गुरव दोन्ही मुलांना घेऊन बाहेर आले. आणि शेजारील लोकांनी उठवले. त्यानंतर सुरेश गुरव यांनी आजरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी केला यशस्वी तपास
पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक आणले. तसेच फॉरेन्सिक लॅबची टीमही आली. गडहिंग्लज, आजरा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी तपास सुरू केला. फिर्यादी सुशांत गुरवकडे माहिती घेत असताना ते खून आणि दरोडा पडल्याचे भासवत होते. त्यांनी फिर्यादी सुशांत यांच्याकडून प्रात्यक्षिक करुन घेतले असता पोलिस अधिकाऱ्यांना त्याच्या जबाबात संदिग्धता दिसून आली. पोलिसांनी कसून तपास केला असता फिर्यादी सुशांत गुरव यानेच पत्नीचा खून केल्याचे निष्पण्ण झाले.
सुशांत गुरव होता कर्जबाजारी
सुशांत गुरव हा कर्जबाजारी झाला होता. त्याने बँकेकडून आणि बऱ्याच लोकांकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी तो पत्नी पूजाकडे सोन्याचे दागिन्यांची मागणी करत होता. सोन्याचे दागिने गहाण ठेऊन लोकांची देणी आणि बँकेचे कर्ज भागवूया असे पत्नीला समजावत होता. सुशांतला सोरायसीसचा आजारही होता. त्या आजारावर औषधोपचार करुया असेही म्हणत होता.
सुशांतने केला पत्नीचा खून
शनिवारी मध्यरात्री पावनेतीन वाजण्याच्या सुमारास पती पत्नीमध्ये वाद झाला. त्यावेळी पत्नी पूजाने तुमच्या आजोबांच्या आजारपणांच्यावेळी पण सोने गहाण ठेवले होते. आता मी सोने देणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा असे सुनावताच सुशांत गुरव याने रागाच्या भरात घरात असलेल्या दगडाने आणि फावड्याने पूजाच्या डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याने दरोड्याचा बनाव केला.
तपासातील अधिकारी आणि कर्मचारी
या गुन्ह्याच तपास इचलकरंजी अतिरिक्त पोलिस उप अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, गडहिंग्लज पोलिस उप अधीक्षक रामदास इंगवले, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, आजरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर या अधिकाऱ्यांच्या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी तपास केला. त्यामध्ये पोलिस उप निरीक्षक शेष मोरे, गळवे, पोलिस हवालदार समीर कांबळे, प्रकाश पाटील, संतोष जंगम, अमित सर्जे, दीपक घोरपडे, कृष्णात पिंगळे, राजू कांबळे, विशाल चौगले, संदीप बेंद्रे, विजय इंगळे, सचिन जाधव, सोमराज पाटील, रोहित मर्दाने, राजेश राठोड, सुहास कांबळे, सुशील पाटील, हंबीरराव अतिग्रे, अनिल जाधव, पोलिस उप निरीक्षक संजय पाटील, युवराज धोंडे, कविता कदम, संदीप म्हसवेकर, साजित शिकलगार, दयांनद बेनके, पांडुरंग बेनके, पांडुरंग येलकर, रेश्मा नाईक, पोलिस कॉन्स्टेबल विशाल कांबळे, नितीन पाटील, अमर उबाळे, विकास कांबळे, वैभव गवळी, सूर्यकांत सुतार, संजय नवलगुंदे, महांतेश पाटील, दत्तात्रय शिंदे, प्रशांत सुतार, रामदास वाघ, प्रकाश पुजारी, विशाल आंबोळे, दीपक किल्लेदार, सुशांत सिंघन यांचा समावेश होता.