Home » Blog » उमर खालिदला अंतरिम जामीन

उमर खालिदला अंतरिम जामीन

खालिदवर नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दंगल भडकावणे आणि हिंसाचार घडवण्यासाठी मोठा कट रचल्याचा त्याच्यावर आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Umar Khalid

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्ता उमर खालिदला दिल्ली न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. कुटुंबातील लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी जामीन मिळावा, यासाठी त्याने अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर बाजपेयी यांनी त्याला सात दिवसाचा जामीन मंजूर केला. बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या (UAPA) कलमांखाली खालिदला अटक केली होती. तो १३ सप्टेंबर २०२०२ पासून तुरुंगात आहे. त्याने जामीनासाठी अनेकवेळा न्यायालयात धाव घेतली. मात्र ते फेटाळण्यात आले होते. (Umar Khalid)

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दंगल भडकावणे आणि हिंसाचार घडवण्यासाठी मोठा कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. खालिदच्या प्रक्षोभक भाषणामुळे जातीय तणाव वाढला, असा आरोपही पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00