Home » Blog » HSC Result 2025 :  बारावी परीक्षेत मुलींचा झेंडा

HSC Result 2025 :  बारावी परीक्षेत मुलींचा झेंडा

९४.५८ टक्के मुली उत्तीर्ण

0 comments
HSC Result 2025

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९१.८८  टक्के लागला आहे.  राज्यात सर्वाधीक उत्तीर्णतेचे प्रमाण कोकण विभागात असून या विभागाचा निकाल ९६.७४  टक्के लागला आहे. सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल ८९.४६  टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.६४ टक्के लागला आहे.  यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. ९४.५८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी ८९.५१ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल ५.०७ टक्क्यांनी अधिक आहे. (HSC Result 2025)

आज सोमवारी  सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. तसेच, दुपारी एक वाजल्यापासून बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाची ऑफिशिअल वेबसाईट mahresult.nic.in वर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच, उद्यापासून (६ मे) महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील. (HSC Result 2025)

निकालाचा टक्का यंदा घसरला

यावर्षी  निकालाचा टक्का घसरला आहे.  फेब्रुवारी- मार्च २०२४ चा निकाल ९३.३७  टक्के लागला होता. तर यावर्षी फेब्रुवारी- मार्च २०२५ चा निकाल ९१.८८  टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का १.४९ टक्क्यांने  घसरला आहे. (HSC Result 2025)

विभागनिहाय निकाल असा

कोकण : ९६.७४  टक्के

पुणे :  ९१.३२ टक्के

कोल्हापूर :  ९३.६४ टक्के

अमरावती : ९१.४३  टक्के

छत्रपती संभाजीनगर :  ९२.२४ टक्के

नाशिक : ९१.३१ टक्के

लातूर :  ८९.४६ टक्के

नागपूर : ९०.५२ टक्के

मुंबई : ९२.९३ टक्के.

या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल

१) https://results.digilocker.gov.in  २) https://mahahsscboard.in 

३) http://hscresult.mkcl.org ४) https://results.targetpublications.org 

५) https://results.navneet.com ६) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

७) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hse-12-results ८) https://www.indiatoday.in/education-today/results 

९) https://www.aajtak.in/education/board-exam-results

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00