Home » Blog » Beed accident : कंटेनरच्या धडकेत सहा तरुण जागीच ठार

Beed accident : कंटेनरच्या धडकेत सहा तरुण जागीच ठार

by प्रतिनिधी
0 comments
Beed accident

बीड : प्रतिनिधी : कंटेनरच्या धडकेत सहा तरुण जागीच ठार झाले. सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गेवराई जवळील गढी येथील उड्डाणपूलावर घडली. महामार्गाच्या दुभाजकात अडकलेली कार बाहेर काढत असताना भरधाव कंटेनरने जोराची धडक दिली. (Beed accident)

घटनास्थळावरील मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री सुमारे साडेआठ  वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर गढी येथील कारखान्यासमोर बाळासाहेब आतकरे यांच्या एक्सयूव्ही गाडीचा किरकोळ अपघात झाला होता. यात कुणीही जखमी झाले नव्हते. मात्र, डिव्हायडरमध्ये अडकलेली कार बाहेर काढत असताना बाळासाहेब आतकरे आणि त्यांचे काही सहकारी सोमवारी रात्री उशिरा घटनास्थळी आले. दुभाजकात अडकलेली गाडी काढत असतानाच अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली. या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Beed accident)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00