Home » Blog » Shahu Vyakhyanmala : राजर्षी शाहू व्याख्यानमालेस २१ जूनपासून प्रारंभ

Shahu Vyakhyanmala : राजर्षी शाहू व्याख्यानमालेस २१ जूनपासून प्रारंभ

by प्रतिनिधी
0 comments
Shahu Vyakhyanmala

कोल्हापूर : प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांच्या १५१ जयंतीनिमित्त राजर्षी शाहू व्याखानमालेस २१ जून रोजी प्रारंभ होत आहे, अशी माहिती राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. २१ ते २५ जून या कालावधीत सायंकाळी सहा वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे व्याखाने आयोजित केली आहेत. (Shahu Vyakhyanmala)

शनिवारी २१ जून रोजी डॉ.भालबा विभुते यांचे ‘भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया आणि स्वरुप’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. डॉ. अशोक चौसाळकर व्याखानाचे अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत. रविवारी २२ जून रोजी श्रीरंग आवटे यांचे व्याख्यान होणार आहे. ‘भारतीय संविधान-मुलभुत अधिकार व कर्तव्ये’ हा व्याख्यानाचा विषय आहे. डॉ. भारती पाटील अध्यक्षस्थानी राहणार आहेत. डॉ. राहूल कोसंबी यांचे ‘भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय’ या विषयावर सोमवारी २३ जून रोजी व्याख्यान होणार आहे. डॉ. जयसिंगराव पवार व्याखानाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. बुधवारी २५ जून रोजी डॉ. प्रताप साळुंखे यांचे ‘भारतीय संविधान व न्यायव्यवस्था’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. डॉ. वसंत भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. (Shahu Vyakhyanmala)

पत्रकार परिषदेला ट्रस्टी डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, ट्रस्टच्या सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, डीवायएसपी सुवर्णा पत्की उपस्थित होत्या. (Shahu Vyakhyanmala)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00