Home » Blog » Congress alleged Pak: हल्ल्यामागचा मास्टरमाइंड पाकिस्तानच

Congress alleged Pak: हल्ल्यामागचा मास्टरमाइंड पाकिस्तानच

काँग्रेसचा आरोप; सुरक्षाविषयक त्रुटींच्या विश्लेषणाची केली मागणी

by प्रतिनिधी
0 comments
CWC alleged Pak

नवी दिल्ली : पहेलगाम दहशतवादी हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्या ‘गुप्तचर यंत्रणांचे अपयश,’ आणि  ‘सुरक्षाविषयक त्रुटीं’वर विश्लेषण केले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेसने केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देश मजबुतीने उभा आहे, असा विश्वासही पक्षाने व्यक्त केला. (Congress alleged Pak)

या हल्ल्यामागचा मास्टरमाइंड पाकिस्तानच आहे, तथापि, आपल्या सुरक्षा यंत्रणांमध्ये काही सुधारणा घडवल्या पाहिजे, अशी अपेक्षाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

२१ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतेकजण पर्यटक आहेत.

दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या काही तास आधी गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) काँग्रेस कार्यकारिणीची बैठक २४, अकबर रोडवरील मुख्यालयात झाली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सीपीपी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पक्षप्रमुख आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी या बैठकीला उपस्थिती लावली. यावेळी पहेलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. (Congress alleged Pak)

‘‘पाकिस्तानने घडवलेले हे भ्याड आणि नियोजनबद्ध दहशतवादी कृत्य आपल्या प्रजासत्ताकाच्या मूल्यांवर थेट हल्ला आहे. देशभरात हिंदूंना जाणूनबुजून लक्ष्य करून भावना भडकवल्या गेल्या आहेत,’’ असा आरोप यावेळी करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन सीडब्ल्यूसीच्या ठरावात करण्यात आले.

‘‘पहेलगाम हा एक कडक पहारा असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. येथे नेहीमी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असते. हा केंद्रशासित प्रदेश आहे. तो थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. अशा हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्या गुप्तचर यंत्रणेतील अपयश आणि सुरक्षेतील त्रुटींचे व्यापक विश्लेषण करणे अत्यावश्यक आहे. व्यापक जनहितार्थाचा विचार करून हे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. ज्या कुटुंबांचे जीवन इतके क्रूरपणे उद्ध्वस्त झाले आहे त्यांना खरोखर न्याय मिळायचा असेल तर त्यासाठी त्रुटींचे व्यापक विश्लेषण करण्याची गरज आहे, ’’ असे पक्षाच्या कार्यकारिणीच्या ठरावात म्हटले आहे. (Congress alleged Pak)

सीडब्ल्यूसीने स्थानिक पोनीवाले आणि पर्यटक मार्गदर्शकांना श्रद्धांजली वाहिली. ‘‘पर्यटकांचे रक्षण करताना तो शहीद झाला, ’’अशा शब्दांत कार्यकारिणीने त्याला श्रद्धांजली वाहिली.

यात्रेकरूंच्या सुरक्षेला प्राधान्य हवे

अमरनाथ यात्रा लवकरच सुरू होणार आहे हे लक्षात घेऊन, पक्षाने म्हटले आहे की यात्रेकरूंच्या सुरक्षेला राष्ट्रीय प्राधान्य दिले पाहिजे. ‘‘यामध्ये कसलाही विलंब न करता मजबूत, पारदर्शक आणि सक्रिय सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे. यात्रेकरूंची सुरक्षा तसेच जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचे जीवनमान, जे पर्यटनावर अवलंबून आहेत, त्यांचे गांभीर्याने रक्षण केले पाहिजे,’’ असे ठरावात म्हटले आहे.

हेही वाचा :
दहशतवाद्यांना शोधून काढून अद्दल घडवू
सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00