मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेवर भाजप शिवसेना युतीने झेंडा फडकावल्यानंतर भाजपने महापौरपदासाठी रितू तावडे यांची तर शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांची उमेदवारी घोषीत केली. ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. रितू तावडे या मुंबई महानगरपालित भाजपच्या पहिल्या महापौर असतील. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेने केली आहे. निवडणूक होणार की बिनविरोध होणार हे काही तासात स्पष्ट होणार आहे. (Ritu Tawade nominated for the mayoral post)
महायुतीकडून महापौर उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात येणार आहेत. दोन्ही पदासाठी उमेदवारांची घोषणा महायुतीने संयुक्तपणे केली. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहूल शेवाळे, मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रसाद लोढा, भाजपचे गटनेते गणेश खणकर उपस्थित होते. अमित साटम यांनी महापौरपदासाठी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांची उमेदवारी जाहीर केली. तत्पुर्वी राहूल शेवाळे यांनी उपमहापौरपदासाठी नगरसेवक संजय शंकर घाडी यांची उमेदवारी घोषणा केली. (Ritu Tawade nominated for the mayoral post)
रितू काटकर या घाटकोपर येथील वॉर्ड क्रमांक १३१ मधून विजयी झाल्या आहेत. त्या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. तर दहिसर पूर्वमधून संजय घाडी निवडून आले आहेत. उपमहापौर हे सव्वा वर्षासाठी असेल असे शेवाळे यांनी जाहीर केले. (Ritu Tawade nominated for the mayoral post)