Home » Blog » ‘केपीं’मुळे मतदारसंघ दहा वर्षे पाठीमागे गेला : डोंगळे

‘केपीं’मुळे मतदारसंघ दहा वर्षे पाठीमागे गेला : डोंगळे

आमदार प्रकाश आबिटकर यांनी संधीचे सोने केल्याचा वक्त्यांचा दावा

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur Politics

बिद्री : प्रतिनिधी : आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळात माजी आमदार के. पी. पाटील मतदारसंघाला न्याय देऊ शकले नाहीत. यामुळे मतदारसंघ दहा वर्षे मागे गेला. याउलट आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने केलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमदार आबिटकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी व्यक्त केले. तुरंबे येथे महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

अरुण डोंगळे पुढे म्हणाले, माजी आमदार के. पी. पाटील यांचा दहा वर्षांचा आमदारकीचा कालावधी लोकांनी पाहिलेला आहे. या कालावधीत ते मतदार संघाला न्याय देऊ शकले नाहीत. यामुळे मतदार संघ दहा वर्षे पाठीमागे गेला आहे. आबिटकरांच्या माध्यमातून झालेली विकासकामे ही तालुक्याला दिशा देणारी आहेत. दहा वर्षांच्या काळात के. पी. पाटील यांनी लक्षात राहण्यासारखी विकासकामे केली नाहीत. त्यामुळे निवडणुकीत कोणत्याही आमिषाला बळी पडू  नका.

मतदार संघाचा विकास करणाऱ्या माणसाला साथ देऊया. निवडणुकीत उच्चांकी मतांनी आमदार आबिटकरांना निवडून देऊन मतदार संघाचे अपूर्ण राहिलेले मंत्री पदाचे स्वप्न साकार करूया, यामध्ये राधानगरीकरांचा मोठा वाटा असेल अशी ग्वाही दिली. डॉ. जालिंदर पाटील यांनी प्रस्थापितांनी उभे केलेले चक्रव्युव्ह भेदून आमदार प्रकाश आबिटकर मोठ्या मताधिक्यानी विजयी करून राधानगरीची जनता निवडणुकीत पुन्हा वाजत-  गाजत विधानसभेत पाठविणार असल्याचे सांगितले. गवई गटाचे तालुका उपाध्यक्ष सातापा कांबळे, संघटक रवींद्र कांबळे, जिल्हा संघटक विलास कांबळे, विश्वास कांबळे, यशवंत कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सरवडे येथील अरुण साठे गटाने जाहीर पाठिंबा दिला.

मताधिक्य देणार : चराटी

मंत्री चंद्रकांत पाटील व आ. प्रकाश आबिटकरांच्या प्रयत्नामुळे आजरा शहराला नगरपंचायत मंजूर झाली. आजरा शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याचबरोबर जिल्हा परिषद मतदार संघातील वाड्यावस्त्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. एकीकडे मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे आमदार आबिटकर, तर दुसरीकडे माजी आमदार के. पी. पाटील मतदारसंघात फिरकतच नव्हते, असे चित्र होते. त्यामुळे आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील जनता आबिटकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00