Home » Blog » CDS Chauhan: सीमापार दहशतवादाविरुद्ध नवी रेडलाइन आखली : जनरल चौहान

CDS Chauhan: सीमापार दहशतवादाविरुद्ध नवी रेडलाइन आखली : जनरल चौहान

by प्रतिनिधी
0 comments
CDS Chauhan

पुणे : पाकिस्तान भारताच्या लष्करी मनुष्यबळाचे नुकसान करण्याचे मनसुबे रचत आहे. मोठ्या प्रमाणात आमचे जवान लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून सीमापार दहशतवादाविरुद्ध पूर्णपणे नवीन रेडलाइन आखली, असे सैन्यदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी स्पष्ट केले. (CDS Chauhan)

व्यावसायिक सैन्यावर तात्पुरत्या नुकसानीचा परिणाम होत नाही. कारण अशा अपयशांपेक्षा एकूण परिणाम खूप महत्त्वाचे असतात, असे जनरल चौहान यांनी मंगळवारी (३ जून ) सांगितले. (CDS Chauhan)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जनरल चौहान यांनी ऑपरेशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात भारताने काही लढाऊ विमाने गमावली हे मान्य केल्याबद्दल त्यांच्यावर झालेल्या टीकेलाही उत्तर दिले.

ते म्हणाले, ‘‘जेव्हा मला आमच्या बाजूचे नुकसान झाल्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा मी म्हटले की हे महत्त्वाचे नाही कारण शेवटी परिणाम काय झाला आणि तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचे आहे.’’

‘‘नुकसान आणि आकडेवारीबद्दल बोलणे फारसे योग्य ठरणार नाही,’’ असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

‘‘युद्धात काही अडथळे आले तरी, तुम्हाला तुमचे मनोबल राखावे लागते,’’ असे सांगून यात तोटा महत्त्वाचा नसून परिणाम महत्त्वाचा असतो, असे ते म्हणाले. (CDS Chauhan)

संरक्षण दलप्रमुखांनी राजकारण आणि हिंसाचारासह युद्धाच्या विविध घटकांवर प्रकाश टाकला आणि नमूद केले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील युद्ध आणि राजकारण समांतर प्रकारची घटना म्हणून घडत होते.

पहेलगाम हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारत आणि हिंदूंविरुद्ध गरळ ओकली होती. तसेच भारतात रक्तपात घडवण्याचा पाकिस्तानचा इरादा होता आणि आहे, मात्र आम्ही सीमापार दहशतवादाविरोधात नवी रेडलाइन आखली असे सांगितले.

पाकिस्तानकडून होणारा राज्य पुरस्कृत दहशतवाद थांबला पाहिजे आणि तो देश भारताला दहशतवादाच्या जाळ्यात अडकवू शकणार नाही, असा ऑपरेशन सिंदूरमागील विचार होता, असे स्पष्ट करून भारत दहशतवाद आणि आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही, असा इशाराही चौहान यांनी दिला. भारताच्या लष्करी हल्ल्यांबद्दल ते म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानी लक्ष्यांवर अचूक हल्ले केले. त्यांपैकी काही हल्ले दोन मीटर इतके अरुंद होते.

हेही वाचा :
भूकंप झाला आणि दोनशे कैदी पळाले
राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00