नवी दिल्ली : विशेष एमपी/एमएलए कोर्टाने काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एका खटल्यात दिलासा दिला. वीर सावरकर यांच्याविषयी कथित टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. याचिकेत त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणीही करण्यात आली होती. तीही कोर्टाने फेटाळली. (Rahul gets relief)
राहुल गांधी यांना १० जानेवारी २०२४ मध्ये कोर्टाने जामीन मंजूर केला होता. शिवाय विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्यासमोर प्रत्यक्ष उपस्थिती लावण्याऐवजी व्हर्च्युअली उपस्थित राहण्याची परवानगीही दिली होती.
त्यानंतर सावरकर यांचे पणतू आणि याचिकाकर्ते सत्यकी सावरकरनी ॲड. संग्राम कोल्हटकर यांच्या माध्यमातून याचिका दाखल करून राहुल गांधी जाणूनबुजून सुनावणीमध्ये उशीर व्हावा, असा आरोप केला होता. तसेच त्यांचा जामीन रद्द करून कडक कारवाईची मागणी केली होती. (Rahul gets relief)
२८ मे रोजी न्यायाधीश शिंदे यांनी अर्ज रद्द केला होता. तसेच,
“आरोपीचा जामीन रद्द करण्याइतपत ठोस कारण नाही. शिवाय आरोपी जाणूनबुजून सुनावणीमध्ये उशीर व्हावा, असे वागत असल्याचे दिसत नाही. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यासंदर्भातही काही कारणे दिसत नाहीत,’’
अशी टिप्पणीही कोर्टाने केली होती.
पार्श्वभूमी
५ मार्च २०२३ रोजी लंडनमध्ये ओव्हरसीज काँग्रेसने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यासंदर्भात असत्य आणि अवमानकारक वक्तव्ये केली होती. याबाबतचे व्हिडीओज सर्वत्र व्हायरल झाले होते, असा सत्यकी सावरकर यांचा दावा आहे.
हेही वाचा :
दिलगिरी व्यक्त करा; कोर्टाची कमल हासन यांना सूचना
गिरीश महाजन दलाल : राऊतांची टीका