कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण असणार आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई येणार आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत. (Bhima Agricultural Exhibition inaugurated on Friday)
उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार महादेवरावजी महाडिक यांच्या हस्ते विविध पुरस्कार वितरण होणार आहेत. उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महापौर रूपाराणी निकम राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष, राजेश क्षीरसागर, खासदार धैयशील माने, आमदार विनय कोरे, राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी, उपमहापौर अक्षय जरग भगिरथी महिला संस्था अध्यक्षा अरुंधती महाडिक आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड अश्या कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. (Bhima Agricultural Exhibition inaugurated on Friday)
प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे. भागीरथी महिला संस्थेच्या वतीने दोनशे बचत गट महोत्सवात स्टॉल मांडणार आहेत. प्रदर्शनामध्ये डॉ. संग्राम धर्माजी काळे, डॉ. केशव हरी पुजारी डॉ.बाळासाहेब सावंत, प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण डॉ. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन), डॉ. भरत तुकाराम पाटील, तालुका कृषी अधिकारी करवीरचे युवराज पाटील, शेखर थोरात यांची व्याख्याने तीन दिवस होणार आहेत. रोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. वृंदावन फाउंडेशनमार्फत महिला, तरुण आणि वंचितासाठी विविध उपक्रम राबवले जातात. या वर्षी प्रदर्शनात फाऊंडेशनचा स्टॉल असणार आहे, अशी माहिती वृंदावन फाउंडेशनच्या संचालिका गौरी सुजित चव्हाण व संचालिका जाई संजय भोसले यांच्या वतीने सुजित चव्हाण यांनी दिली. (Bhima Agricultural Exhibition inaugurated on Friday)
भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.