Home » Blog » ‘गोकुळ’वर पाच सदस्याचे प्रशासक मंडळ नियुक्त

‘गोकुळ’वर पाच सदस्याचे प्रशासक मंडळ नियुक्त

0 comments
Board of Administrators Appointed to ‘Gokul’

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) राज्य सरकारने प्रशासक नियुक्त मंडळ नियुक्त केले आहे. सातारा जिल्हा उपनिंबधक संजयकुमार विश्वनाथ सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्याचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईपर्यंत हे संचालक मंडळ गोकुळचे नियमित कामकाज पाहणार आहे. (Board of Administrators Appointed to ‘Gokul’)

गोकुळच्या विद्यमान संचालकांची मुदत मंगळवारी पाच मे रोजी संपणार आहे. नवीन सदस्य नोंदणी आणि न्यायालयीन प्रक्रिया यामुळे गोकुळची निवडणूक पाच ते सहा महिन्याने होणार आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्याने राज्य सरकारने गोकुळवर प्रशासक नियुक्त केला आहे. पुणे विभागाचे सहकारी संस्था दुग्ध विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. (Board of Administrators Appointed to ‘Gokul’)

सातारा जिल्हा उप निबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, पुणे मुळशी सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, कोल्हापूर सहकारी संस्था पणन विभागातील विशेष लेखा परिक्षक सागर बलकवडे, जिल्हाधिकारी कार्यालय धर्मादाय रुग्णालय कक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत परुळेकर हे सदस्य असणार आहे. हे प्रशासक मंडळ गोकुळचे दैनंदिन काम पाहणार आहे. (Board of Administrators Appointed to ‘Gokul’)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00