Home » Blog » महायुतीची शंभर मते फुटली: भाजपच्या कदमांचा दणदणीत विजय

महायुतीची शंभर मते फुटली: भाजपच्या कदमांचा दणदणीत विजय

by प्रतिनिधी
0 comments
BJP's Dhairyashil Kadam victorious

सांगली : प्रतिनिधी : सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम यांनी ३०१ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. तरीही या निवडणुकीत भाजप महायुतीची १०० मते फुटली. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीची मते फुटत असताना सातारा सांगली विधान परिषदेत महायुतीची १०० मते फुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीतील राग शिवसेना आणि राष्ट्रवादी काढल्याची चर्चा आहे. (BJP’s Dhairyashil Kadam victorious)

धैर्यशील कदम यांना ५९३ मते

सांगली, सातारा विधान परिषद निवडणुकीत ८९४ मतदान होते. आज सकाळी सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळाच्या इमारतीमध्य मतमोजणी झाली. मतदानामध्ये ९ मते अवैध ठरली. भाजपच्या धैर्यशील कदम यांना ५९३ मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली.

महायुतीची मते फुटली

या मतदार संघातील सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यात महायुतीचे संख्याबळ ६४६ आहे. तर महाविकास आघाडीची फक्त १९५ मते होती. संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीची मते फुटत असताना या मतदारसंघात मात्र महायुतीची तब्बल १०० मते फुटली. महाविकास आघाडीचे संख्याबळ १९५ असताना जगताप यांना २९२ मते मिळाली. (BJP’s Dhairyashil Kadam victorious)

सातारा जि.प. निवडणुकीचा महायुतीला फटका?

महायुतीने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. भाजपकडून सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयप्रकाश गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. तर महाविकास आघाडीकडून आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांनी धुरा सांभाळली. तरीही महायुतीची शंभर मते फुटली.

दोन महिन्यापूर्वी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. पण त्याचा फटका विधान परिषद निवडणुकीत पहायला मिळाला. (BJP’s Dhairyashil Kadam victorious)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00