Home » Blog » Bhagvat : ‘भागवतां’चा ‘पंच्याहत्तरी’चा रोख कोणाकडे ?

Bhagvat : ‘भागवतां’चा ‘पंच्याहत्तरी’चा रोख कोणाकडे ?

by प्रतिनिधी
0 comments
Bhagvat

मुंबई : प्रतिनिधी : ‘पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडल्यानंतर व्यक्तीने थांबले पाहिजे’ असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या वक्तव्याचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्ष पूर्ण करणार असल्याने भागवतांनी सूचक वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. (Bhagvat)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत इंगळे यांच्या आयुष्यावरील ‘मोरोपंत पिंगळे, अर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, संघाच्या कार्यात प्रसिद्धीपासून दूर रहात पंचाहत्तरीनंतर निवृत्त होण्याचा वस्तुपाठ पिंगळेंनी घालून दिला होता. जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडत. त्याचा अर्थ थांबले पाहिजे असा असतो. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी वयाच्या पंचाहत्तीनंतर राजकीय जीवनातून निवृत्ती घेतली पाहिजे अशी चर्चा सुरू झाली आहे.

भागवतांनी पिंगळे यांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले पिंगळे हे विनोदी स्वभावाचे होते. त्यांची शरीरयष्टी किरकोळ होती. घरी पाहुणे आली की मुलं कोण आलं असे विचारतात. जेव्हा मी घरी जातो तेव्हा मुलं विचारतात आई हे काय आलं? अशी पिंगळे यांची शरीरयष्टी होती. पिंगळे एकदा म्हणाले होते की, जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं. तुमचं वय झालं आहे. बाजूला राहा, आम्हाला काम करु द्या, अशी आठवण भागवतांनी करुन दिली. (Bhagvat)

भागवतांचे हे पिंगळेंचे उदाहरण देऊन कुणाला संकेत दिले आहेत अशी चर्चा भाजप वर्तुळात सुरू झाली आहे. पिंगळे यांचा आदर्श ठेऊन भाजपमधील ज्येष्ठ नेते पंच्याहत्तरीनंतर थांबणार आणि नवीन लोकांना संधी देणार का अशी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० मध्ये झाला आहे. सध्या त्यांचे वय ७४ वर्ष असून १७ सप्टेंबरला ते ७५ वर्ष पूर्ण करुन ७६ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. २०१४ पासून ते भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कारकीर्दीला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. (Bhagvat)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00