Home » Blog » महाराष्ट्राचे वर्तमान आणि भविष्यावर होणार विचारमंथन

महाराष्ट्राचे वर्तमान आणि भविष्यावर होणार विचारमंथन

कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमाला १६ डिसेंबरपासून

by प्रतिनिधी
0 comments
Avinash Pansare Vyakhanmala

कोल्हापूर; प्रतिनिधी : श्रमिक प्रतिष्ठानतर्फे १६ ते २२ डिसेंबर  या कालावधीत कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्राचे वर्तमान आणि भविष्यावर विचारमंथन होणार आहे. ‘महाराष्ट्र कसा आहे, कसा असावा,’ या मध्यवर्ती विषयावर सात दिवस मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे रोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहे.

१६ डिसेंबर रोजी, दत्ता देसाई यांचे ‘कथा महाराष्ट्राची : अस्मिता, सत्ता आणि जनता’ या विषयावर, १७ डिसेंबरला डॉ. गणेश देवी यांचे ‘महाराष्ट्र संस्कृतीतील अंतर्विरोध’, १८ डिसेंबरला डॉ. नीरज हातेकर यांचे ‘महाराष्ट्र : शिक्षण आणि रोजगार,’ १९ डिसेंबरला डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे ‘जातीय अस्मिता आणि राजकारण’ तर २० डिसेंबरला डॉ. विजय चोरमारे यांचे ‘महाराष्ट्रातील पक्षीय राजकारणाचे बदलते रंग’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. २१ डिसेंबरला डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे ‘भांडवलशाहीच्या अरिष्टात महाराष्ट्र’ तर २२ डिसेंबर रोजी डॉ. आनंद मेणसे यांचे ‘उद्याचा महाराष्ट्र’ या विषयावर व्याख्यान आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नुकत्याच झाल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची वर्तमान स्थिती आणि पुढील दिशा कशी असावी या संबंधी विचारमंथन होणे गरजेचे आहे. व्याख्यानमालेत महाराष्ट्राची संकल्पना व वारसा, सांस्कृतिक जीवन, जातिव्यवस्था, शिक्षण-रोजगार,  अर्थकारण, राजकारण आणि उद्याचा महाराष्ट्र यासंबंधी मान्यवर वक्ते मांडणी करणार आहेत. या व्याख्यानामालेस नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. मेघा पानसरे यांनी केले आहे.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00