Home » Blog » Avimukteshwaranand: मराठीचा आग्रह धरणारे ठाकरे मगधचे : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

Avimukteshwaranand: मराठीचा आग्रह धरणारे ठाकरे मगधचे : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

by प्रतिनिधी
0 comments
Avimukteshwaranand

मुंबई : पहिलीपासून त्रिभाषासूत्र आणि त्या अनुषंगाने हिंदी सक्तीचा छुपा डाव लक्षात आल्यानंतर महाराष्ट्रात वादळ उठले. सर्व स्तरांतून तीव्र विरोध सुरू झाला. राजकीय पक्षही या वादात उतरले. काही मराठी कलाकार आणि साहित्यिकांसह मराठी संघटनाही हिंदी सक्तिविरूद्धच्या आंदोलनात उतरल्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न उग्र होतोय हे लक्षात येताच सरकारने हिंदी सक्तीचा अध्यादेश मागे घेतला. (Avimukteshwaranand)

तत्पूर्वी मनसेने आयोजित केलेल्या मोर्चाला उद्धव ठाकरेंच्या पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. अध्यादेश स्थगितीनंतर ठाकरे यांनी विजयी मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मराठी न बोलणाऱ्या परप्रांतियांना हिसका दाखवा, मात्र त्याचे व्हिडीओ काढू नका, असा सल्ला आपल्या समर्थकांना दिला. या पार्श्वभीवर शंकराचार्य अविमुक्तश्वरानंद यांनी ठाकरे कुटुंबीयांबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्याची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. (Avimukteshwaranand)

शंकराचार्यांनी मराठीचा आग्रह धरणारे ठाकरेच महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, असे म्हटले आहे. त्यांच्याच कुटुंबातील आजोबा-पणजोबांनी आम्ही मगधहून आल्याचे लिहून ठेवल आहे. मग मगधहून तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्ही मराठी होतात का? असा प्रश्न उपस्थित करून, महाराष्ट्राने मगधहून आलेल्या ठाकरेंना स्वीकारले. त्यांना मोठे केले. त्यांचे वंशज मराठीसाठी भांडत आहेत. मराठीला थोबाडीत देणारी भाषा, मारहाण करणारी भाषा बनवायची आहे का? असा सवालही त्यांनी केला.

मेळाव्यातील राज ठाकरेंच्या विधानाची दखल सरकारने घेतली पाहिजे असेही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे. एबीपी न्यूजशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. (Avimukteshwaranand)

राज, उद्धव यांची युती यशस्वी होणार नाही

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दलही त्यांनी भाष्य केले. या दोघांची युती यशस्वी होईल असे वाटत नाही. राज ठाकरे यांची राजकारण करण्याची पद्धत वेगळी आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. त्यांच्या सहकाऱ्यांची धोरणेही वेगळी आहेत. त्यामुळे हे दोन बंधू जास्त काळ एकत्र राहणार नाहीत. कारण राज ठाकरे एका समाजाला घेऊन चालतात तर उद्धव ठाकरे आता सर्वसमावेशक विचारांचे झाले आहेत, असे शंकराचार्य म्हणाले.

हेही वाचा :
‘भागवतां’चा ‘पंच्याहत्तरी’चा रोख कोणाकडे ?
आरएसएसकडून मोदींना निवृत्तीच्या सूचना : संजय राऊत

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00