Home » Blog » Rabri alleges NDA : तेजस्वी यांच्या हत्येचा चारवेळा प्रयत्न : राबडी देवी

Rabri alleges NDA : तेजस्वी यांच्या हत्येचा चारवेळा प्रयत्न : राबडी देवी

by प्रतिनिधी
0 comments
Rabri alleges NDA

पाटणा : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी शुक्रवारी (२५ जुलै) गंभीर आरोप केला. त्यांचा मुलगा तेजस्वी प्रसाद यादव यांचा जीव धोक्यात आहे. यापूर्वी त्यांची हत्या करण्याचे चार प्रयत्न झाले आहेत, असा आरोपही राबडी देवी यांनी केला. (Rabri alleges NDA)

तेजस्वी यांना बिहारमध्ये विरोधी पक्ष इंडिया गटाचा मुख्यमंत्री चेहरा मानले जाते. अद्याप तशी औपचारिक घोषणा झालेली नसली तरी तेच विरोधकांच्यादृष्टीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत.

विधान परिषदेच्या पोर्टिकोमध्ये बोलताना राबडी देवी यांनी हा गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या, तेजस्वी यांना यापूर्वी वाटेत मारण्याचे चार प्रयत्न झाले आहेत. येथेही त्यांना पुन्हा मारण्याचे कट रचला जात आहे. (Rabri alleges NDA)

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा, पाचवा दिवस होता. अधिवेशनात सहभागी होण्यासाठी त्या सभागृहात आल्या होत्या.

अशा कटांमागे भाजप-जेडी(यू) लोक आहेत असा थेट आरोप करत त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर आरोप केले. त्यांच्याकडे “शिष्टाचाराचा अभाव” असल्याचेही त्या म्हणाल्या. (Rabri alleges NDA)

बिहार विधानसभेत एक अप्रिय घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राबडी यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर हे आरोप केले. या घटनेदरम्यान विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य एकमेकांवर धावून गेले. प्रकरण जवळजवळ हाणामारीवर आले, परंतु सुदैवाने सुरक्षा दलांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या दरम्यान, भाजपच्या एका सदस्याने टेबलावरून माइक उपसला आणि तेजस्वी यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे धाव घेतली, असा आरोप राजदच्या काही सदस्यांनी केला आहे. हे सर्व आरोप एनडीए नेत्यांनी फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा :
‘ऑपरेशन सिंदूर’वर सोमवारी चर्चा
मागासवर्गीयांच्या जागा जाणूनबुजून रिकाम्या ठेवण्याचे षडयंत्र : राहुल गांधी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00