बारामती : विलिनीकरणावर भाष्य करण्याचा देवेंद्र फडणवीसांना कोणताही अधिकार नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. बारामती येथे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अनेक विषयावर भाष्य केले.
पक्ष विलिनीकरणाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवारांचे नाव घेतले होते, यावर शरद पवार म्हणाले, फडणवीस यांनी माझा उल्लेख का केला हे समजले नाही. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यासोबत सुरू होती. या सगळ्या चर्चेत फडणवीस कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. (Fadnavis has no right to comment on the merger)
सुनेत्रा पवारांना उप मुख्यमंत्रीपद देण्यात आले यावर शरद पवारांनी त्यांना संधी दिली याचा आनंद आहे अशी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या अपघातावर अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत यावर पवार म्हणाले, अधिकृत माहिती मिळत नाही तो पर्यंत मी अपघातासंदर्भात उगीचच शंका घेणार नसल्याचे स्पष्ट केले. अजित पवारांचे स्मारक उभारले जाणार आहे याबाबत शरद पवार म्हणाले. मीही वर्तमानपत्रात वाचले होती त्यांचे स्मारक उभारले जाणार आहे. पण मला याची माहिती नाही. मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. मला याबददल माहिती असली पाहिजे. पण मी त्याबद्दल चर्चा ऐकली आहे. स्मारकाबाबत एकत्र बसून चर्चा करु. सध्या चर्चाच झाली नसताना त्याबद्दल भाष्य करणे योग्य नाही असेही ते म्हणाले. (Fadnavis has no right to comment on the merger)