कोलकोता : बरुईपूरमध्ये ११ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन हत्या केलेल्या निषेधार्थ तृणमुल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या मोर्चावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंडी फेकल्याचा आरोप करण्यात आला. तसेच रॅलीच्या दरम्यान ‘चोर, चोर’ च्या घोषणाही दिल्या. मोर्चात अडकाठी आणण्याचा प्रयत्न भाजप सरकार आणि कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप तृणमुल काँग्रेसने केला आहे. (Eggs were thrown at Mamata Banerjee’s rally)
मोर्चात पोलिसांचा लाठीमार
टीएमसीने कोलकोता येथील बालिगंज फारी ते हाजरा मोरे या मार्गावर मोर्चा काढला. रॅलीदरम्यान भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या युवा शाखेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पेटल्याचे प्रकार पहायला मिळाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. रॅलीच्या सुरवातीपासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक पहायला मिळाली. ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाजवळील हाजरा क्रॉसिंगजवळ पोहण्यापूर्वी तीन किलोमीटरच्या मार्गावर अधूनमधून भाजप कार्यकर्त्यांनी अडथळे आणले. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यामध्ये तणाव वाढत गेल्याने अखेर हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. (Eggs were thrown at Mamata Banerjee’s rally)
भाजप कार्यकर्त्याप्रमाणे पोलिस वागत आहेत
पोलिसांकडून निष्पक्षपणे कारवाई करत येत नसल्याचे सांगून ममता बॅनर्जी यांनी पोलिस दल भाजप संघटनेचा एक भाग म्हणून काम करत असल्याचा आरोप केला. बंगालमध्ये अराजकता माजली असून पोलिस भाजप कार्यकर्त्यांप्रमाणे वागत आहेत असा आरोपही केला. दरम्यान तृणमुल काँग्रेसच्या युवा शाखेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या समर्थकाना चिथावणी दिल्याने संघर्ष झाला असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
कोर्टाच्या परवानगीनंतर मोर्चा निघाला
पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्याविरोधात टीएमसीने उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने अनेक अटींच्या अधीन राहून रॅली काढण्याची परवानगी दिली. मोर्चात लाऊडस्पीकरला परवानगी नाकारली पण हातातील मायक्रोफोनला परवानगी दिली. मोर्चात सहभागी झालेल्या टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांनी समर्थकांना शांतता आणि शिस्त राखण्याचे आवाहन केले. तसेच भाजपवर कार्यक्रम विस्कळीत केल्याचा आरोप केला. (Eggs were thrown at Mamata Banerjee’s rally)