Home » Blog » MP Dhairyashil Mane : खासदार माने यांच्यासह पवार,देवणे, शिंत्रे, मोदी यांच्यावर बेळगावात प्रवेश बंदी

MP Dhairyashil Mane : खासदार माने यांच्यासह पवार,देवणे, शिंत्रे, मोदी यांच्यावर बेळगावात प्रवेश बंदी

by प्रतिनिधी
0 comments
MP Dhairyashil Mane

बेळगाव : प्रतिनिधी :  महाराष्ट्रातील हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्यासह  कोल्हापूर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क नेते विजय देवणे, संजय पवार, सुनील मोदी आणि सुनील शिंत्रे यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. उद्या शनिवारी एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने काळा दिन पाळला जातो. या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे खासदार माने यांच्यासह शिवसेनेचे नेते जाणार असल्याने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे. (MP Dhairyashil Mane)

                       बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती शनिवारी कर्नाटक राज्योत्सव दिनी काळा दिन पाळणार आहे. खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापुरातील शिवसेना नेते शनिवारी काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन  आक्षेपार्ह भाषण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेळगावातील कन्नड आणि मराठी भाषिकात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे असे पत्र बेळगावच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

                   निपाणीच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापुरातील शिवसेना नेत्यांना काळा दिन कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असल्याची माहिती मिळाली असल्याचे पत्रात  बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी नमूद केले आहे. (MP Dhairyashil Mane)

                  या पत्राला अनुसरून बेळगावचे जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांनी खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते विजय देवणे, संजय पवार, सुनील शिंत्रे आणि सुनील मोदी यांना बेळगाव जिल्ह्यात एक नोव्हेंबर रोजी प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. (MP Dhairyashil Mane)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00