नाशिक : प्रतिनिधी : नाशिकमधील कुंभनगरीत ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळा पर्वास सुरूवात झाली. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आज शनिवारी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी कुंभमेळा पर्वास सुरूवात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रृंगेरी पिठाच्या शंकराचार्यांसह १३ आखाड्याचे प्रमुख महंत उपस्थित होते. पुढील वर्षी २०२७ पासून कुंभमेळा सुरू होणार आहे. (President Droupadi Murmu inaugurates the Simhastha Kumbh Mela)
कुंभमेळ्याच्या पर्वासाठी नाशिकाचा गोदाकाठ चांगलाच सजला आहे. भगव्या पताकांनी नाशिक नगरी सजली आहे. गोदावरी नदीवरील मंदिरे फुलांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळली आहेत. रामकुंडावर ५१ फूट उंचीचा मुख्य धर्मध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यासाठी पंचधातूचा वापर करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर ३१ फूट उंचीचा मुख्यध्वज स्तंभ उमारण्यात आला. रामकुंडावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते तर त्र्यंबकेश्वरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. (President Droupadi Murmu inaugurates the Simhastha Kumbh Mela)
सायंकाळी महागोदा आरती झाली. राष्ट्रपती मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत सहा हजार अदिवासी बांधव आरतीत सहभागी झाले होते. त्र्यंबेकश्रवर, सुरगणा, दिंडोरी, निफाड या सात तालुक्यातील ६५० गावपाड्यातील अदिवासी स्त्री पुरुषांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार गोकुळ गीते, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, श्री हरिगिरीजी महाराज, विविध आखाड्यांचे साधू, महंत, स्थानिक राहिवासी आदी उपस्थित होते. (President Droupadi Murmu inaugurates the Simhastha Kumbh Mela)