मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील नऊ मंत्री हे कॅप्टन थोरात या भोंदूबाबाचे नियमित भक्त होते. त्यांच्याकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधी करत होते, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. खरातचे अनेक राजकीय नेत्यांशी संबध होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरात यांच्याशी संबध असल्याने विरोधी पक्षासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. खरात याच्या कृष्णकृत्यावर टीका करतात खासदार राऊत यांनी टीकास्त्र सोडले. जगात एपस्टीन फाईल्स तर महाराष्ट्रात खरात फाईल्स गाजत आहे अशी टीका केली. खरात प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या कारवाईबद्दल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री कौतुकास पात्र आहेत अशी स्तुती केली. (Nine ministers were performing a despicable ritual)
खासदार राऊत म्हणाले, अशोक खरात हा फडणवीसांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचे गुरुमहाराज आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या मोबाईलवर अनेक आक्षेपार्ह क्लिप्स सापडल्या आहेत. फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील अर्धे मंत्री तणावाखाली आहेत. काही लोकांना आयसीयूमध्ये भरती करावं लागलं आहे, अशी माहिती समोर येत आहे. या भोंदूबाबाने पोलिसांना जी माहिती दिली आहे. सध्याच्या मंत्रीमंडळातील नऊ मंत्री या भोंदूबाबाचे नियमित भक्त आहेत. त्याच्याकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधी करत होते, अशी टीका केली. (Nine ministers were performing a despicable ritual)
रुपाली चाकणकराबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, हा विषय फक्त महिला आयोगाच्या अध्यक्षापुरता मर्यादीत नाही. या प्रकरणात काही मंत्री, नेतेही आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षांना जावेच लागेल. त्यांना घालवण्यात मुख्यमंत्री कमी पडले तर ते राज्याचे दुर्देव ठरेल, असेही संजय राऊत म्हणाले. (Nine ministers were performing a despicable ritual)