Home » Blog » मोहन भागवतांना पाकिस्तानी म्हणणार का? : संजय राऊत

मोहन भागवतांना पाकिस्तानी म्हणणार का? : संजय राऊत

by प्रतिनिधी
0 comments
Raut criticizes Bhagwat

मुंबई : प्रतिनिधी : मोहन भागवतांना मंत्री नितेश राणे पाकिस्तानी म्हणणार का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानशी चर्चेच् पर्याय खुले ठेवण्याची गरज व्यक्त केली होती. त्यावर खासदार राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. (Raut criticizes Bhagwat)

आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी पाकिस्तानशी चर्चेचे पर्याय खुले ठेवण्याची गरज व्यक्त केली होती. त्याला मोहन भागवन यांनी समर्थन दिले आहे. होसबळे यांचे समर्थन करताना मोहन भागवत यांनी स्पष्टीकरण देताना पाकिस्तान या राष्ट्रापेक्षा तेथील जनतेशी संबधित असल्याचे सांगितले. भविष्यात एकाद्या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केल्यास तेथील लोकांना शांततेत जगण्यासाठी सक्षम करणे आवश्यक ठरते. त्यासाठी या देशाशी चर्चेचे मार्ग कायम खुले ठेवले पाहिजेत असे भागवत म्हणाले. (Raut criticizes Bhagwat)

त्यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, नारायण राणे यांचे चिरंजीव जे मंत्री आहेत ते नेहमी अनेकांना पाकिस्तानी म्हणतात. आता ते भागवतांना पाकिस्तानी म्हणणार का? हिमंत असेल तर त्यांनी पाकडे म्हणावे, असे आव्हानही त्यांनी राणेंना दिले. मात्र पाकला चिरडून टाकले पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूरमधून माघार घेतली तेव्हाच भाजप पाकिस्तांनी झाला आहे अशी टीका केली. (Raut criticizes Bhagwat)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00