जमीर काझी : मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर झालेल्या विद्यार्थ्यांच्या (जेन झी) आंदोलनाला देशद्रोही कृत्य असल्याचे म्हणणाऱ्या केंद्र सरकार व भाजपा नेत्यांना त्यांची मातृभूमी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घरचा आहेर दिला आहे. आंदोलन करणे म्हणजे नवीन पिढी किंवा जेन झी राष्ट्रविरोधी आहे असा अर्थ होत नाही, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी सुराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. (Bhagwat’s advice to the BJP)
शिक्षण व्यवस्थेवर आवाज उठवणे योग्य
मुंबईत एका संस्थेने आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनांचे समर्थन करत लोकशाहीत आंदोलन हे संवादाचेच एक माध्यम असल्याचे सांगितले. देशातील आजची युवा पिढी आपल्या हक्क आणि प्रश्नांसाठी प्रश्न विचारत असून, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठवणे ही त्यांची योग्य तक्रार आहे, अशी महत्त्वाची भूमिकाही मांडली.
नीट पेपर फुटी प्रकरणी तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी व जयंतीच्या वतीने जंतर-मंतर मैदानावर जवळपास एक महिना आंदोलन सुरू होते दिल्ली पोलिसांनी २० जुलै रोजी अमानुष लाठीमार करीत विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली त्याबाबतचे पडसाद अद्यापही उमटत असून भाजपाचे मंत्री, नेते, पदाधिकाऱ्याकडून या आंदोलनात देशद्रोही घटक सहभागी असल्याचे आरोप केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भागवत तरुणांशी संवाद साधताना कोणती भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. भागवत यांनी आंदोलनाबाबत मते मांडीत भाजपाला व केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. (Bhagwat’s advice to the BJP)
तरुणांशी नाते टिकवायचे असेल तर उत्तरे द्यावीच लागतील
नवीन पिढी आणि जुन्या पिढीतील फरकावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, पूर्वीची पिढी मोठ्यांचे ऐकून घेत असे, परंतु आजची तरुण पिढी उत्तर मागते. जर नाते टिकवायचे असेल तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. भारतीय परंपरेत याला ‘शास्त्रार्थ’ असे म्हटले जाते आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. तरुणांनी आंदोलन करू नये असे मी म्हणणार नाही, पण ते कसे आणि कोणत्या मार्गाने करायचे याची नियमावली संविधानात दिलेली आहे. तरुण आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत असतील तर समाज आणि प्रशासनाने त्यामागील कारणांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
शिक्षण धंदा नसून मुलभुत गरज
शिक्षण व्यवस्थेच्या व्यापारीकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत ते म्हणाले की, शिक्षण हा कोणताही व्यावसायिक धंदा नसून मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाला शिक्षण मिळेल अशी संरचना तयार झाली पाहिजे. अनेक दशकांपासून देशातील शिक्षण व्यवस्थेवर जीडीपी च्या ६ टक्के खर्च करण्याची मागणी केली जात असून, संघही या मागणीचे पूर्ण समर्थन करतो. केवळ शाळा चालवून पैसे कमावणे हा शिक्षणाचा हेतू नसून, नवीन पिढी घडवणे हाच मूळ उद्देश असायला हवा, असे भागवत यांनी स्पष्ट केले.
सरकार आणि समाजाने शिक्षण व्यवस्था मजबूत केली पाहिजे
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांचे योग्य प्रशिक्षण होणे सर्वात आधी गरजेचे आहे .तसेच शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी केवळ सरकारवर सोडून चालणार नाही, तर समाजानेही पुढे आले पाहिजे. सरकार आणि समाज या दोघांनी मिळून देशातील शिक्षण व्यवस्था मजबूत केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. (Bhagwat’s advice to the BJP)