Home » Blog » शिवकुमारांच्या मंत्रीमंडळातील मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा दोन दिवसात राजीनामा

शिवकुमारांच्या मंत्रीमंडळातील मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा दोन दिवसात राजीनामा

by प्रतिनिधी
0 comments
Minister Ramalinga Reddy to resign within two days

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. दोन दिवसापूर्वी तीन जून रोजी सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत १२ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यामध्ये रामलिंगा रेड्डीही होते. (Minister Ramalinga Reddy to resign within two days)

मंत्री रेड्डी यांनी खातेवाटपावर नाराज होत राजीनामा दिला आहे. डी.के.शिवकुमार यांनी २०२३ मध्ये त्यांना मुख्यमंत्री झाल्यावर नगरविकास खाते देण्याचे आश्वासन दिले होते. माझा वारंवार अपमान होत असल्याने मला हे सहन होत नसल्याने राजीनामा दिला आहे. यापुढे मी काँग्रेसचा आमदार म्हणून काम करत राहीन, अशी प्रतिक्रिया दिली. (Minister Ramalinga Reddy to resign within two days)

७२ वर्षी रामलिंगा रेड्डी यांना जलसंपदा खाते दिले होते. त्यांनी मागणी केलेले नगरविकास खाते कृष्णा बायरे गौडा देण्यात आले. त्यामुळे नाराज असलेल्या रेड्डी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. रेड्डी यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी दिसू आली. रेड्डी यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री शिवकुमार यांनी म्हणाले ते माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही चर्चा करुन प्रश्न सोडवू. सर्व काही ठीक होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Minister Ramalinga Reddy to resign within two days)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00