Home » Blog » भाजप सरकारने देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटले

भाजप सरकारने देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटले

by प्रतिनिधी
0 comments
BJP has pushed the country into the abyss of economic recession

मुंबई : प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करत भाजपावर कडाडून हल्लाबोल केला आहे. सरकार अमृतकाळाची जाहिरात करते पण आर्थिक परिस्थिती त्यांनी देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटले आहे,अशी टीका केली आहे. (BJP has pushed the country into the abyss of economic recession)

जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात  म्हटले की, “अमृतकाळ”च्या जाहिराती सुरू आहेत, पण अर्थव्यवस्था काय सांगते? मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत जीएसटी  संकलनात जवळपास ५० हजार कोटींची (~२०%) मोठी घट झाली आहे. आयबीआयने आज दिलेल्या माहितीनुसार महागाई दर ४.६% वरून ५.१% वर गेल्याचा अंदाज आहे. जीडीपी ग्रोथ रेट ६.९% वरून ६.६% वर घसरण्याचा अंदाज आहे. (BJP has pushed the country into the abyss of economic recession)

पुढे ते म्हणाले की, जेव्हा महागाई वाढते, तेव्हा विकासाचा वेग कमी होतो आणि सामान्य नागरिकाची क्रयशक्ती घटते, तेव्हा अर्थव्यवस्थेची खरी अवस्था सरकारी जाहिरातींमधून नाही तर बाजारातून दिसते. देशातील तरुण रोजगारासाठी झगडत आहेत, उद्योग गुंतवणुकीत सावध आहेत आणि सामान्य कुटुंबांचा खर्च वाढत आहे. म्हणून प्रश्न पडतो, देश विकासाच्या मार्गावर आहे की आर्थिक मंदीच्या धोकादायक वळणावर? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे. (BJP has pushed the country into the abyss of economic recession)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00