Home » Blog » देश आर्थिक संकटात अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत

देश आर्थिक संकटात अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत

by प्रतिनिधी
0 comments
Modi is in Italy handing out chocolates

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटली दौऱ्यात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॉकलेटचे पॅकेट गिफ्ट दिल्यानंतर समाजमाध्यमात मोदींच्या विरोधात टीकेचा सूर उमटला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनीही मोदीवर निशाना साधताना ‘देश आर्थिक संकटात असताना मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत’ अशी टीका केली आहे. (Modi is in Italy handing out chocolates)

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी इटली देशाचा दौरा केला. इटलीत रोम येथे त्यांनी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मेलोडी चॉकलेटचे पॅकेट भेट म्हणून दिले. या भेटीचा व्हिडिओ शेअर मेलोनी यांनी मोदींचे आभार मानले. त्यावर राहूल गांधी यांनी टीका केली आहे. ‘एक्स’वर पोस्ट करताना राहूल गांधी म्हणाले आहेत की, देश आर्थिक संकटात आहे आणि आपले पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट्स वाटत आहेत. एकीकडे शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि छोटे व्यावसायिक अक्रोश करत आहेत. मात्र दुसरीकडे मोदी हे हसत आहेत आणि रिल्स बनवत आहेत. त्यावर भाजप टाळ्या वाजत आहे. हे नेतृत्व नाही तर नौंटकी आहे’. (Modi is in Italy handing out chocolates)

मोदी यांचे इटलीची राजधानी रोम येथे आगमन झाल्यावर मेलोनी यांनी एक सेल्फी शेअर करत ‘वेलकम टू रोम, माय फ्रेंड’ असे म्हणत इटलीत त्यांचे स्वागत केले आहे. मोदी यांनीही मेलोनी यांच्यासोबत असलेले फोटो शेअर केले आहेत. (Modi is in Italy handing out chocolates)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00