Home » Blog » होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक सुरू

होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक सुरू

by प्रतिनिधी
0 comments
Shipping traffic resumes through the Strait of Hormuz)

नवी दिल्ली : होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तासात २६ जहाजांनी सामुद्रधुनीतून प्रवास केला आहे. वाहतूक सुरू असली तरी इराणी नौदलाची परवानगी सक्तीची करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात ही वाहतूक वेगाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सामुद्रधुनीतून वाहतूक सुरू झाल्याने इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वाढली आहे. (Shipping traffic resumes through the Strait of Hormuz)

आमच्या परवानगीनंतरच जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करतील असे इराणच्या आयआरजीसी नौदलाने स्पष्ट केले आहे. आयआरजीसीने म्हटले आहे की, आवश्यक परवानग्या दिल्यानंतर त्यांच्याशी समन्वय साधून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक सुरू आहे. गेल्या २४ तासात इराणच्या समन्वयाने तेलवाहू जहाजे, कंटेनर जहाजे आणि इतर जहाजे अशा २६ जहांजांनी सामुद्रधुनीतून प्रवास केला. (Shipping traffic resumes through the Strait of Hormuz)

दक्षिण कोरियाचा टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पार झाला आहे. दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की इराण युद्ध सुरू झाल्यानंतर दक्षिण कोरियाच्या जहाजाने केलेला हा पहिला प्रवास आहे. हे तेलवाहू जहाज असून त्यावर अंदाजे १० कोरियन कर्मचारी आहेत. (Shipping traffic resumes through the Strait of Hormuz)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00