मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमापूर्वी पीएम ऑफिस कर्मचारी असल्याचे भासवून कार्यक्रमस्थळी प्रवेश करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. एकाजवळ बंदूक मिळाली असल्याने खळबळ उडाली. तसेच त्यांच्याकडे पीएमओ ची बनावट ओळखपत्रे मिळाली आहेत. बीकेसी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस ठाण्यात ठेवण्याचा आदेश दिला आहे. (Two arrested at Modi’s event)
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ चे उद्धघाटन करणार होते. मुंबई पोलिसांनी दोघांकडे चौकशी असता त्यांनी मी पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. रोहन पारेख असे या व्यक्तीचे नाव होते. त्याच्यासोबत एक सुरक्षा रक्षकही होता. त्याच्याजवळ बंदुकही होती. रोहन पारेखच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे ओळखपत्र बनावट असल्याचे आढळून आले. पोलिसांना दोघांना अटक करुन बंदूक जप्त केली. पोलिस दोघांकडे कसून चौकशी करत असून कार्यक्रमस्थळी का उपस्थित होते याची कसून चौकशी केली जात आहे. (Two arrested at Modi’s event)
पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितले की, तीन व्यक्तींनी संशयास्पद सरकारी ओळखपत्र वापरुन आणि शस्त्र बाळगून तसेच मॉलची सुरक्षा यंत्रणा चुकवून जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे जप्त केलेल्या बंदुकीचा परवाना असल्याचे स्पष्ट झाले. (Two arrested at Modi’s event)