Home » Blog » ‘राष्ट्रवादी’च्या विकास लवांडे यांच्यावर शाईहल्ला

‘राष्ट्रवादी’च्या विकास लवांडे यांच्यावर शाईहल्ला

संग्राम भंडारे आणि सहका-यांचे वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारे कृत्य

0 comments
Ink thrown at NCP's Vikas Lavande

पुणे : वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली आहे अशी टीका करुन वीस घुसखोर वारकऱ्यांची यादी जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईहल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील हवेली येथे घडली. किर्तनकार संग्राम भंडारे आणि दहा ते पंधरा गोरक्षकांनी ही शाईफेक केल्याचा आरोप लवंडे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Ink thrown at NCP’s Vikas Lavande)

पुणे जिल्ह्यातील हवेली येथील प्रवचन संपल्यावर दहा वाजण्याच्या सुमारास विकास लवांडे यांच्यावर शाईहल्ला करण्यात आला. हल्ला करण्याऱ्यांनी पिस्तूलाचा धाक दाखवल्याचा आरोपही लवांडे यांनी केला आहे. काही दिवसापूर्वी वारकरी संप्रदायात हिंदुत्ववाद्यांनी घुसखोरी केली आहे, असा आरोप लवांडे यांनी केला होता. या प्रकारावरुन त्यांच्यावर आजचा हल्ला करण्यात आला.(Ink thrown at NCP’s Vikas Lavande)

या संदर्भात विकास लवांडे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले, वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात संग्राम भंडारे आणि दहा ते पंधरा गोरक्षक मोटरसायकलवरुन आले. हवेली येथे माझे प्रवचन होते. प्रवचन संपल्यावर घरी परतत असताना त्यांनी माझी गाडी अडवून माझ्यावर हल्ला केला. मला धक्काबुक्की करुन पिस्तूल दाखवली. त्यानंतर ते पळून गेले. मी लोणी काळभोर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. पुणे पोलिस आयुक्तांनी ताबडतोब माझ्यावर हल्ला करणाऱ्या सर्व गुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Ink thrown at NCP’s Vikas Lavande)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00