Home » Blog » भाजपकडून भ्रष्ट व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्याची परंपरा कायम : संजय राऊत

भाजपकडून भ्रष्ट व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्याची परंपरा कायम : संजय राऊत

0 comments
BJP upholds its tradition of making a corrupt individual the CM

मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने अत्यंत भ्रष्ट व्यक्तीला मंत्री आणि मुख्यमंत्री बनवण्याची परंपरा कायम ठेवली आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये आज मुख्यमंत्री शपथविधी सोहळा होणार आहे. त्यावर टीका करताना खासदार राऊत यांनी भाजपचे वाभाडे काढले. (BJP upholds its tradition of making a corrupt individual the CM)

संजय राऊत म्हणाले, २०२० मध्ये एक स्टिंग ऑपरेशन झाले होते. त्यामध्ये तृणमुल काँग्रेसच्या पाच खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आले. पाच खासदारांना सुवेंदू अधिकारी होते. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्यावर ईडी आणि अँटी करपश्नच्या धाडी टाकण्यात आला. त्यानंतर अधिकारी भाजपमध्ये सामील झाले आणि आज ते मुख्यमंत्री बनत आहेत, अशी टीका केली. (BJP upholds its tradition of making a corrupt individual the CM)

संजय राऊत म्हणाले, लाच स्वीकारताना ते व्हिडिओ टाकणार आहे. सुवेंदू अधिकारी हे आजही वॉशिंग मशिनमध्ये फिरत आहेत. त्याच्यावरील डाग स्वच्छ झालेला नाही. ते सरळ पैसे स्वीकारतात. तरीही त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री पद दिले जात आहेत. भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा राखली आहे. त्यांच्या या कन्सिटन्सीचं अभिनंदन केले पाहिजे असा टोलाही मारला. (BJP upholds its tradition of making a corrupt individual the CM)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00