नवी दिल्ली : व्यावसायिक सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने भरीव वाढ केल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर महागाई वाढणार असल्याचा इशारा यापूर्वीच आपण दिला होता, याकडे राहूल गांधी यांनी लक्ष वेधले. (81% Hike in LPG Prices in Three Months.)
कामगार दिनी केंद्र सरकारने व्यावसियक सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांची वाढ केली. त्यावर राहूल गांधी यांनी एक्स वर पोस्ट करत टीका केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की मी यापूर्वीच म्हटले होते की निवडणूकीनंतर महागाईचे चटके बसणार आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडर ९९३ रुपयांनी महागला आहे. एका दिवसातील ही सर्वात मोठी दरवाढ आहे. हे निवडणुकीचे बिल आहे. फेब्रुवारीपासून आतापर्यंत: १,३८० रुपयांची वाढ – अवघ्या ३ महिन्यांत तब्बल ८१% ची प्रचंड वाढ. चहाचे स्टॉल्स, ढाबे, हॉटेल्स, बेकरी आणि मिठाईची दुकाने यांसारख्या छोट्या व्यवसायांवर याचा परिणाम जाणवेल आणि घरगुती खर्चावरही परिणाम होईल, असे ते म्हणाले. (81% Hike in LPG Prices in Three Months.)
चहाचे दुकान, ढाबा, हॉटेल, बेकरी, मिठाईचे दुकान – प्रत्येकाच्या स्वयंपाकघरावरील भार वाढला आहे. आणि याचा परिणाम तुमच्या ताटावरही होईल. मंगळवारी सकाळी त्यांनी असाही आरोप केला होता की, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुदुचेरी आणि तामिळनाडू यांसारख्या अनेक राज्यांमध्ये मतदानाचे टप्पे संपल्यानंतर सरकार पेट्रोलियमच्या किमती वाढवेल. राहुल गांधी यांनी केंद्रावर जोरदार टीका करताना म्हटले की, “निवडणुकीनंतरचा दिलासा संपला, आता महागाईचा तडाखा बसणार आहे! २९ एप्रिलनंतर सावध रहा – पेट्रोल, डिझेल, सर्व काही महाग होणार. जेव्हा तेल स्वस्त होते, तेव्हा मोदी सरकारने नफा खिशात घातला. आता ते महाग झाले आहे, म्हणून ते त्याचा बोजा तुमच्यावर टाकतील. हे असे सरकार आहे जे स्वस्त असताना लूट करते आणि महागाईचा फटका जनतेला सोसायला लावते.” (81% Hike in LPG Prices in Three Months.)