Home » Blog » शिवसेना १५४, मनसे ६३, राष्ट्रवादी १०

शिवसेना १५४, मनसे ६३, राष्ट्रवादी १०

by प्रतिनिधी
0 comments
Shiv Sena MNS and NCP seats announced

मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक अर्ज भरण्यास अवघे काही क्षण बाकी असताना मुंबई महानगरपालिकेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्या जागा वाटपाची आकडेवारी बाहेर आली आहे. शिवसेना १५४ जागेवर लढणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६३ जागांवर लढणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष १० जागांवर लढणार आहे. (Shiv Sena, MNS, and NCP seats announced)

राज ठाकरे यांनी शिवसेना मनसे पक्षाच्या युतीची घोषणा केल्यानंतर जागा वाटप जाहीर करण्यास नकार दिला होता. पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी आणि सत्ताधारी पक्षाने करुघोडी करु नये यासाठी जागा वाटप जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. काल सोमवारी आणि मंगळवारी सकाळपासून दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्मचे वाटप सुरू आहे. शिवसेना सर्वात जास्त १५४ जागावर लढणार आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला ६३ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे आव्हान मोडीत काढण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटही या युतीत सहभागी झाला आहे. तीनही पक्ष प्रादेशिक असल्याने मतदारांचा कौल कसा मिळणार हे निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. (Shiv Sena, MNS, and NCP seats announced)

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तिरंगी चौरंगी होण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना आणि आरपीआय आघाडीने विरोधी पक्षातील तगड्या उमेदवारांची भरती करुन मुंबईवर भगवा फडकावण्याची घोषणा केली आहे. भाजपला रोखण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आला आहे. काँग्रेस पक्षाने वंचित आघाडीबरोबर लढणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने वेगळी चूल मांडली आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. (Shiv Sena, MNS, and NCP seats announced)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00