Home » Blog » India condemned Pakistan: अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्यांना भीक घालत नाही; पाकला इशारा

India condemned Pakistan: अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्यांना भीक घालत नाही; पाकला इशारा

by प्रतिनिधी
0 comments
India condemned Pakistan

नवी दिल्ली : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीचा भारताने  सोमवारी (११ ऑगस्ट) तीव्र शब्दांत निषेध केला. भारत अशा धमक्यांना भीक घालत नाही, आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व पावले उचलत राहू, असा इशाराही दिला आहे. (India condemned Pakistan)

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी यासंबंधीचे निवेदन जारी केले आहे.

मुनीर यांचे वक्तव्य म्हणजे पाकिस्तानच्या ‘अण्वस्त्र सज्जतेचे’ हे आणखी एक उदाहरण असल्याचेही भारताने म्हटले आहे. अशा वक्तव्यांमध्ये अंतर्भूत असलेल्या बेजबाबदारपणाबद्दल जागतिक समुदाय आपले निष्कर्ष काढू शकतो असे सांगून, भारताने मुनीर यांच्या ‘अण्वस्त्र ब्लॅकमेलिंग’बद्दल चिंता व्यक्त केली. (India condemned Pakistan)

‘‘अमेरिकेच्या भेटीदरम्यान पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी केलेल्या कथित वक्तव्यांकडे आमचे लक्ष वेधले गेले आहे. मित्रत्वाचे संबंध असलेल्या राष्ट्राच्या भूमीवरून मुनीर यांनी हे वक्तव्य केले आहे ही बाब खेदजनक आहे ,’’ असे परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) एका निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना फील्ड मार्शल मुनीर यांनी ही टिप्पणी अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना केली आहे. (India condemned Pakistan)

‘‘अशा वक्तव्यांमध्ये अंतर्निहित बेजबाबदारपणाबद्दल आंतरराष्ट्रीय समुदाय स्वतःचे निष्कर्ष काढू शकतो, ज्यामुळे अशा देशात अण्वस्त्र सज्जता आणि नियंत्रणाच्या अखंडतेबद्दलच्या शंकांना बळकटी मिळते. विशेष म्हणजे तिथे लष्कर दहशतवादी गटांशी हातमिळवणी करत आहे,’’ असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

फ्लोरिडाच्या टाम्पा येथे पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना, फील्ड मार्शल मुनीर यांनी भारतासोबतच्या भविष्यातील युद्धात त्यांच्या देशाला अस्तित्वाचा धोका निर्माण झाल्यास अणु धमकी दिल्याचे वृत्त आहे.

‘‘आपण एक अणुसंपन्न राष्ट्र आहोत. जर आपल्याला कुणी तरी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्यासह अर्धे जगाला गाडून टाकू,’’ अशी धमकी मुनीर यांनी दिल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00