लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९० वर्षी लातूर येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज शुक्रवारी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
शिवराज विश्वनाथ पाटील यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२५ मध्ये लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाल. हैद्राबादमधील उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी विज्ञान विषयाची पदवी मिळवली. मुंबई विद्यापीठातून लॉ ची पदवी घेतली. (Former Union Home Minister Shivraj Patil passes away)
१९७२ ते १९८० या कालावधीत ते लातूर शहराचे आमदार होते. राज्य मंत्री, विधानसभा उप सभापती, विधानसभा अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली. १९८० मध्ये लातूर लोकसभा मतदार संघातून ते विजयी झाले. त्यांनी सात वेळा लोकसभेच्या निवडणूका जिंकल्या. लोकसभेत त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली. १९८० च्या दशकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी सरंक्षणमंत्रीपदही भूषवले. १९९१ ते १९९६ पर्यंत ते लोकसभेचे दहावे अध्यक्ष होते. २००४ ते २००८ या कालावधीत ते केंद्रीय गृहमंत्री होते. २००८ मध्ये मुंबईवर २६/११ चा हल्ला झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. २०१० ते २०१५ मध्ये ते पंजाबचे राज्यपाल होते. (Former Union Home Minister Shivraj Patil passes away)
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राच्या शालिनता, सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे आणि तो राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पोहचविणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते शिवराज पाटील- चाकूरकर सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री शिवराज पाटील – चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनामुळे राजकारण- समाजकारणातील उत्तुंग अशा मार्गदर्शक नेतृत्वाला मुकलो आहोत, अशी शोकभावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. (Former Union Home Minister Shivraj Patil passes away)