Home » Blog » Maharashtra pattern in Bihar : बिहारमध्ये ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न ’ : संजय राऊत

Maharashtra pattern in Bihar : बिहारमध्ये ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न ’ : संजय राऊत

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra pattern in Bihar

मुंबई : बिहार निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या प्रचंड बहुमताबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. एकदम महाराष्ट्र पॅटर्न अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. (Maharashtra pattern in Bihar)

राऊत यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर टीका केली आहे. एक्सवर पोस्ट करताना खासदार राऊत यांनी बिहाराच्या विधानसभा निवडणूक निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि भाजपा यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते, ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते. ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न’. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती, त्यांना ५० च्या आत संपवले, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. (Maharashtra pattern in Bihar)

बिहार विधान सभा निवडणुकीत भाजप आणि जनता दल युनायटेड या दोन्ही पक्षांनी एकत्रित जागा लढवल्या होत्या. भाजप, जदयु, लोजप एकत्रित एनडीए विरोधात राजद, काँग्रेस, डावे यांच्या महागठबंधन मध्ये चुरस होती. पण प्रत्यक्षात मतमोजणीनंतर एनडीएला प्रचंड विजय मिळाला आहे. एनडीएने २०५ जागा जिंकल्या आहेत. महागठबंधनला फक्त ३१ जागांवर समाधान मानावे लागले आहे. इतर पक्षांना ७ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचे तर पानिपत झाले आहे. त्यांना अवघ्या ४ जागा मिळाल्या आहेत. (Maharashtra pattern in Bihar)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00