Home » Blog » Shashi Tharoor’s advice to the party : शशी थिरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

Shashi Tharoor’s advice to the party : शशी थिरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

by प्रतिनिधी
0 comments
Shashi Tharoor's advice to the party

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस पक्षाची काय चूक झाली हे गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. संघटनात्मक चुकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असा सल्ला थरुर यांनी दिला आहे. (Shashi Tharoor’s advice to the party)

काँग्रेसने बिहार निवडणुकीत अतिशय खराब कामगिरी केली आहे. त्यांना दुहेरी आकडासुद्धा गाठता आलेला नाही. त्यांचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण करताना म्हणाले, “एनडीएकडे मोठ्या प्रमाणात आघाडी असल्यामुळे आता चित्र स्पष्ट झाले आहे. हे खूप निराशाजनक आहे. अंतिम निकाल समोर आल्यानंतर त्यावरून गंभीर आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. आत्मपरीक्षण करणे म्हणजे फक्त बसून विचार करणे असा नव्हे तर काय चूक झाली? रणनीती आखण्यात काय चूक झाली? संदेश पोहोचवण्यात काय चूक झाली?यावेळी झालेल्या संघटनात्मक चुकांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.” असे म्हणत शशी थरूर यांनी पक्षाला सल्ला दिला आहे. “मी बिहारमध्ये प्रचार केलेला नाही. मला बिहारमध्ये प्रचार करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते आणि म्हणूनच मी तुम्हाला प्रत्यक्ष माहिती देऊ शकत नाही. पण मी लोकांशी बोलत असून आपल्या पक्षाच्या नेत्यांनी गोष्टी कुठे गेल्या याचे खूप गंभीर विश्लेषण केले पाहिजे.” असा घराचा आहेर त्यांनी यावेळी पक्षाला दिला आहे. (Shashi Tharoor’s advice to the party)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00