कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक गोकुळने दिवाळी भेट दिले आहे. यंदाही म्हैस व गायीच्या अंतिम दूध दर फरकापोटी तब्बल १३६ कोटी ०३ लाख रुपये एक ऑक्टोबर रोजी थेट प्राथमिक दूध संस्थाच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. गोकुळ कडून लाखो दूध उत्पादकांना मिळालेली स्नेहपूर्ण दिपावली भेट ठरणार असल्याचे माहिती गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली. (Gokul’s Diwali gift)
या आर्थिक वर्षात एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर दोन रुपये ४५ पैसे व गाय दूधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर एक रुपये ४५ पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. दूध संस्थासाठी प्रतिलिटर सरासरी एक रुपये २५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स पोटी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांना हीरक महोत्सवी जादा दर फरक म्हैस दुधास प्रतिलिटर २० पैसे व गाय दुधास प्रतिलिटर २० पैसे देण्यात आला आहे व तो वरील दर फरकामध्ये समाविष्ठ आहे. (Gokul’s Diwali gift)
गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दूधाकरीता ६६ कोटी ३७ लाख ७० हजार रुपये तर गाय दूधाकरीता ४५ कोटी १४ लाख ८ हजार रूपये इतका दूध दर फरक व दर फरकावर सहा टक्क्याप्रमाणे प्रमाणे होणारे व्याज पाच कोटी ५२ लाख ८९ हजार व डिंबेचर व्याज ७.८०% प्रमाणे १० कोटी ६७ लाख ३५ हजार रूपये व शेअर्स भांडवलावरती ११% प्रमाणे डिव्हिडंड ८ कोटी ३८ लाख ६९ हजार रूपये असे एकूण १३६ कोटी ०३ लाख रूपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे. (Gokul’s Diwali gift)
या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळ संलग्न आठ हजार १२ दूध संस्थांच्या सुमारे पाच लाख दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या एकूण १३६ कोटी ०३ लाख रुपये अंतिम दूध दर फरका व्यतिरिक्त गोकुळने या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ ४२ कोटी रुपये पशुवैद्यकीय उपचार, कृत्रिम रेतन, वैरण विकास, मायक्रोट्रेनिंग, दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान, मिल्को टेस्टर खरेदी, कॉम्प्युटर खरेदी, शैक्षणिक सहल, दूध उत्पादकांना किसान विमा पॅलिसी, भविष्य कल्याण निधी, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान व वासरू संगोपनवरती अनुदान व सेवा-सुविधा वरती खर्च केले आहेत. (Gokul’s Diwali gift)
गोकुळने प्रतिदिनी दूध संकलनाचा १८ लाख ५९ हजार लिटरचा टप्पा ओलाडला असून दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढून एका दिवसात सणानिमित्त २३ लाख ६३ हजार लिटरची दूध विक्री केली आहे. तसेच सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास ६० रुपये ४८ पैसे तर गाय दूध उत्पादकास ३६ रुपये ८४ पैसे इतका उच्चांकी दूध दर अंतिम दरफरकासह मिळाला आहे.
यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी उपस्थित होते. (Gokul’s Diwali gift)